उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले

उसने घेतलेले पैसे वेळेत परत न दिल्यामुळे चिडून एका व्यक्तीला मारहाण करत अ‍ॅसिड टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उसने घेतलेले पैसे वेळेत परत न दिल्यामुळे चिडून एका व्यक्तीला मारहाण करत अ‍ॅसिड टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधीर सुधाकर भांबोरे (वय ४०, रा. पर्वतीगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून उमेश शहाजी साळुंके (रा. धनकवडी) याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांबोरे हे रिक्षा चालविण्याचे काम करतात, तर साळुंके याची सुरक्षाएजन्सी आहे. भांबोरे यांनी साळुंकेकडून दोन लाख रुपये उसने घेतले होते. त्यातील पन्नास हजार रुपये त्यांनी परतही केले होते. मात्र, राहिलेले दीड लाख देण्यास उशीर झाला. पाच फेब्रुवारी रोजी साळुंकेने भांबोरे यांना बोलवून घेतले. पैसे लवकर न दिल्यामुळे भांबोरेला तिघांनी बेदम मारहाण केली. त्यांचे कपडे काढून अ‍ॅसिड ओतले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. घरी सोडल्यावर त्यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Acid thrown on man for money

ताज्या बातम्या