scorecardresearch

पिंपरी चिंचवड निवडणुकीवर अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “गड आला पण…”

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी विजय मिळवला आहे. अश्विनी जगताप यांचा ३६,०९१ मतांनी मोठा विजय झाला.

Ashwini Jagtap BJP
अश्विनी जगताप

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी विजय मिळवला आहे. अश्विनी जगताप यांचा ३६,०९१ मतांनी मोठा विजय झाला. त्यांना ३७ व्या फेरीनंतर एकूण १ लाख ३५ हजार ४३४ मतं मिळाले. दुसरीकडे महाविकासआघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मतं मिळाली. या निवडणुकीवर अश्विनी जगताप यांनी प्रतिक्रिया दिली.

अश्विनी जगताप म्हणाल्या, “ही निवडणूक माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. गड आला, पण सिंह गेला. लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं, त्यामुळे आम्हा सर्वांना त्यांचा गड राखायचा होता. तो गड सर्वांनी राखला आहे.”

“मी हा विजय लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते”

“माझा सुरुवातीपासून सर्वांवर विश्वास होता. मी हा विजय लक्ष्मण जगताप आणि सर्व सामान्य नागरिकांना समर्पित करते. माझे वरिष्ठ नेते जेव्हा सांगतील तेव्हा मी अधिवेशनालाही येणार आहे. मी सर्वसामान्यांचा आमदार म्हणून काम करेन. सर्वांसाठी आमचे दरवाजे खुले असतील,” असं मत अश्विनी जगताप यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : Chinchwad Bypoll Election Result 2023: चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचा मोठा विजय; काटे-कलाटेंमुळे मतांची फाटाफूट?

राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फायदा झाला का?

राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फायदा झाला का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अश्विनी जगताप म्हणाल्या, “नक्कीच, राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा मला फायदा झाला.”

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 18:07 IST
ताज्या बातम्या