पुणे : पवार कुटुंब आजही एकच आहे. कुटुंबामध्ये महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे घेतले जातात. छोटे-छोटे निर्णयही एकत्रित विचारातून घेतले जातात. त्यामुळे बारामतीमधील ‘ते़’ निनावी पत्र समाजमाध्यमातून कोणी प्रसारित केली, याची माहिती नाही, असे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. बारामती शहरात पवार कुटुंबाविषयी एक निनावी पत्र समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आले. ते पत्र कोणी प्रसारित केले, याची चर्चा बारामतीबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली असतानाच खासदार सुळे यांनी त्याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा >>> पुण्यात भाजपाचा उमेदवार पदाधिकाऱ्यांकडून होणार निश्चित

पवार कुटुंब आजही एकच आहे. कुटुंबामधील महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे घेतले जातात. छोटा निर्णयही एकत्रित विचारातून होतात. लग्न, शिक्षण असे अनेक निर्णय एकत्रित घेतले जातात. कुटुंबामध्ये निर्णय घेताना एखाद्याला पुढे मागे व्हावे लागते,’ असे सुळे यांनी सांगितले. अनेक भ्रष्टाचारी भाजपमध्ये गेले आहेत. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो. भ्रष्टाचाराचा नाही. आम्ही घराणेशाही जपणारे आहोत, हे मी संसदेमध्येही म्हटले आहे. भाजपमध्येही घराणेशाही आहे. पक्षाची लढाई दडपशाही विरोधातील आहे. ती लढाई व्यक्तिगत नाही. राज्याच्या विरोधात असणाऱ्यांसमोर आम्ही उभे आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन गौरविले होते. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री असताना पवार यांनी चुकीची कामे केल्याच्या मोदींच्या आरोपावर काही बोलणार नाही, असे सुळे म्हणाल्या.