लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक भागांत उभ्या असलेल्या धोकादायक जाहिरातफलकांमुळे जीव टांगणीला लागला आहे. पिंपरी-चिंचवडमधील किवळे परिसरात सोमवारी (१७ एप्रिल) सायंकाळी पाऊस सुरू झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे नागरिक जाहिरात फलकाच्या आडोशाला थांबले. त्या वेळी जाहिरात फलकाचा सांगाडा नागरिकांच्या अंगावर कोसळला. या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तसेच दहा ते बारा जण जखमी झाल्याची घटना घडली.

Tendu Season, Gadchiroli Tendu Season, Gadchiroli district, Tendu Season Hit, Price Demands, Unseasonal Rain, Unseasonal Rain Affecting Local Economy, Naxalite Extortion,
गडचिरोली : तेंदू व्यवसाय मंदावल्याने नक्षल्यांची आर्थिक कोंडी!
Mumbai’s BMC urges citizens to avoid street food during summers here’s why you should be careful too
“उन्हाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नका”, BMC चे आवाहन; विक्रेत्यांसह ग्राहकांनी कशी बाळगावी सावधगिरी?
Leakage in the tunnels of the Sea Coast Project before the monsoon
पावसाळ्यापूर्वीच सागरी किनारा प्रकल्पातील बोगद्यांना गळती, मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी पाहणी
akola farmers rasta roko marathi news,
अकोला : कपाशीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’, काळ्या बाजारात दुप्पट दराने विक्री
survey of factories in dombivli midc area
डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे सर्वेक्षण; गॅस गळती, सांडपाणी यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर करडी नजर
Jalgaon banana farm destroyed
जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे केळीबागा आडव्या, मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान
Prevent acquisition of land in Koyna Valley which is highly sensitive in terms of nature and environment
कोयनेच्या खोऱ्यातील जमीनचंगळवाद रोखा! ‘लोकसत्ता’तील वृत्तानंतर सार्वत्रिक संताप
girl from andheri robbed by throwing inflammable
कल्याणमध्ये अंधेरीतील तरूणीवर ज्वलनशील पदार्थ टाकून लुटले

धोकादायक जाहिरात फलकामुळे नागरिकांचे बळी गेल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात आली. अशाच प्रकारची घटना पुण्यातील मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात ५ ऑक्टोबर २०१८ रोजी घडली होती. अमर शेख चौकातील रेल्वे प्रशासनाच्या जागेत लावलेला जाहिरातफलक अचानक कोसळला. या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला होता.

आणखी वाचा- जाहिरातफलक नव्हे; मृत्यूचा सापळा!

शाहीर अमर शेख चौकातील दुर्घटनेत श्यामराव गंगाधर कासार (वय ७०, रा. पिंपळे गुरव, पुणे), श्याम राजाराम धोत्रे (वय ४५, रा. देहूरोड), जावेद मिसबाउद्दीन खान (वय ४९), शिवाजी देवदास परदेशी (वय ४०, रा. नाना पेठ, पुणे) यांचा मृत्यू झाला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेले शिवाजी परदेशी रिक्षाचालक होते. दुर्घटनेच्या आदल्या दिवशी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. पत्नीच्या अस्थींचे विसर्जन करून घरी परतत असताना जाहिरातफलक कोसळून परदेशी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जाहिरातफलक लावणारी संस्था, रेल्वेतील अधिकारी, अभियंता यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

धोकादायक जाहिरात फलक खिळखिळे

पिंपरीतील किवळे परिसरात जाहिरात फलक कोसळून पाच जणांचे बळी गेल्याच्या घटनेनंतर धोकादायक जाहिरात फलकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख चौकातील इमारतींवर जाहिरात फलकांचे लोखंडी सांगडे आहेत. ऊन, वारा, पावसामुळे जाहिरात फलकांचे लोखंडी सांगाडे खिळखिळे झाल्याने गंभीर स्वरूपाची दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये ४३४ अनधिकृत होर्डिंग, धोरणाची अंमलबजावणी प्रलंबित

महापालिकेची जबाबदारी परवानगीपुरती

शहरातील महत्त्वाच्या चौकांत लावण्यात येणाऱ्या जाहिरातफलकांना महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून परवानगी देण्यात येते. जाहिरातफलकांच्या लोखंडी सांगड्यांची देखभाल आणि दुरुस्तीवर देखरेख करणारी यंत्रणा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.