लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: सासवड रस्त्यावर वडकी गावाजवळ भरधाव बसने मोटारीला धडक दिल्याने मोटारीतील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मोटारचालकासह तिघे जण जखमी झाले. अपघातानंतर पसार झालेल्या खासगी बस चालकाच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Katraj Kondhwa road, Four girls drowned pune
कात्रज-कोंढवा रस्त्यावर खड्ड्यात साचलेल्या पाण्यात चार मुली बुडाल्या, एकीचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे तीन मुली बचावल्या
pune, Death of a cleaning worker, electric shock accident in Balewadi, Death of cleaning worker due to electric shock, Balewadi area,
पुणे : विद्युत वाहिनीच्या धक्क्याने सफाई कर्मचारी महिलेचा मृत्यू, बालेवाडी भागातील दुर्घटना
Navi Mumbai, knife attack,
नवी मुंबई : रस्त्यावर एकावर चाकू हल्ला, बार आणि लॉजमध्ये घुसून टोळक्याचा धुडगूस, पाच जणांवर गुन्हा दाखल
Mumbai girl suicide marathi news
मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं, मंत्रालयासमोरची घटना
bhusawal bjp former corporator murder marathi news
दुहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरले; भाजपच्या माजी नगरसेवकासह सामाजिक कार्यकर्त्याची हत्या
Goa bus Accident
गोव्यात भीषण अपघात; रस्त्यालगतच्या झोपड्यांवर धडकली बस, चार मजूरांचा मृत्यू, पाच जखमी
Bangladesh MP Anwarul Azim Anar Missing
बांगलादेशातील बेपत्ता खासदाराचा कोलकात्यात मृतदेह आढळला; हत्या झाल्याचा पोलिसांना संशय
man inhuman torture to his wife in Pimpri-Chinchwad is arrested by police
पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीवर पतीचे अत्याचार, राक्षसी कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विजय गुंडू शिरगुरे (वय ८५, रा. हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. अपघातात मोटारचालक मयूर विजय शिरगुरे, त्यांचा मुलगा सम्यक आणि विवाहित बहीण ज्योती जितेंद्र गुंडप्पनकर जखमी झाले आहेत. अनुषा विजय शिरगुरे (वय ३०) यांनी या संदर्भात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोटारचालक मयूर, त्यांचे वडील विजय, मुलगा सम्यक, बहीण ज्योती सासवड रस्त्याने पुण्याकडे निघाले होते. दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वडकी गावाजवळ भरधाव खासगी बसने मोटारीला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या विजय यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पसार झालेल्या बसचालकाचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक दाभाडे तपास करत आहेत.