scorecardresearch

सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ‘एमएचटी-सीईटी’ ही परीक्षा ११ जूनपासून सुरू होईल. 

SSC HSC board exam

पुणे : राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ‘एमएचटी-सीईटी’ ही परीक्षा ११ जूनपासून सुरू होईल. 

सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी शुक्रवारी रात्री संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले. यंदा फेब्रुवारीपासून सीईटीसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सीईटीच्या संभाव्य वेळापत्रकानुसार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या गटाची परीक्षा ११ ते १६ जून, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) या गटाची परीक्षा १७ ते २३ जून दरम्यान होईल. व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए) सीईटी २४ ते २६ जून आणि संगणकशास्त्र (एमसीए) सीईटी २७ जूनला होईल असे नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सविस्तर सीईटी परीक्षांचे वेळापत्रक सीईटी सेलच्या संकेतस्थळावर पाहता येईल.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cet cell engineering pharmacology degree agriculture mca time table akp

ताज्या बातम्या