Premium

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड शनिवारी पुण्यात

न्यायमूर्ती चंद्रचूड हे मूळचे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर गावचे आहेत. कनेरसर येथे त्यांचा वाडा आहे.

cji dhananjay chandrachud on pune visit on saturday, dhananjay chandrachud in pune visit
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड शनिवारी पुण्यात (संग्रहित छायाचित्र)

पुणे : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड शनिवार आणि रविवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुण्यातील लवळे येथील एका खासगी विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. तसेच लोणावळा येथील कैवल्यधाम येथील योग संस्थेला भेट देणार आहेत. त्यांचा पुण्यात एक दिवस मुक्कामही असणार आहे. पुणे दौऱ्यासाठी सरन्यायाधीश चंद्रचूड हे दिल्ली येथून मुंबईत येणार आहेत. मुंबईहून ते पुण्याला येणार आहे. एक दिवस त्यांचा पुण्यात मुक्काम असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : एमपीएससीतर्फे विविध विभागांमध्ये मोठी भरती, अर्ज प्रक्रिया १२ डिसेंबरपासून

पुण्यातील एका खासगी विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यासाठी चंद्रचूड उपस्थित राहणार आहेत. तसेच लोणावळा येथील कैवल्यधाम येथील योग संस्थेला भेट देणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड हे मूळचे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर गावचे आहेत. कनेरसर येथे त्यांचा वाडा आहे. या ठिकाणी सन २०१६ मध्ये कनेरसर येथे चंद्रचूड एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी या वाड्याला भेट दिली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chief justice of india dhananjay chandrachud pune visit on saturday pune print news psg 17 css

First published on: 06-12-2023 at 19:44 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा