Premium

देशात कोळशाचा धूर… बातमी आनंदाची की, संकटांना आमंत्रण देणारी?

नोव्हेंबर महिन्यात अकरा टक्क्यांनी कोळशाचे उत्पादन वाढून ८४५.३ लाख टनांवर गेले आहे.

Coal production increased by eleven percent in the month of November
कोळशाच्या वाढलेल्या उत्पादनाची बातमी आनंदाची की संकाटाला आमंत्रण देणारी, असा प्रश्न उपस्थित होतो.(फोटो- संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी, हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी आटापिटा सुरू आहे. कोळशाच्या ज्वलनातून तयार होणाऱ्या औष्णिक ऊर्जेऐवजी हरित ऊर्जेवर भर दिला जात आहे. भारतीचीही तीच भूमिका राहिली आहे. एकीकडे आपण हरित ऊर्जेचा आग्रह धरतो आहोत. तर दुसरीकडे आपली मदार आजही औष्णिक ऊर्जेवर आहे. नोव्हेंबर महिन्यात अकरा टक्क्यांनी कोळशाचे उत्पादन वाढून ८४५.३ लाख टनांवर गेले आहे.

केंद्र सरकार एकीकडे आत्मनिर्भर भारताचे गोडवे गात आणि तर दुसरीकडे आपण पर्यावरणाच्या ऱ्हासाला हातभार लावत आहोत. त्यामुळे कोळशाच्या वाढलेल्या उत्पादनाची बातमी आनंदाची की संकाटाला आमंत्रण देणारी, असा प्रश्न उपस्थित होतो.

आणखी वाचा-मावळची जागा कोण लढविणार? उदय सामंत म्हणाले, “मावळचे नवे खासदार…”

कोळसा मंत्रालयाने नोव्हेंबर २०२३ महिन्यात एकूण कोळसा उत्पादनात उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे. ११.०३ टक्के वाढीसह नोव्हेंबर महिन्यात ८४५.३ लाख उत्पादन झाले आहे. मागील वर्षीच्या याच महिन्यात ते ७६१.४ लाख टनांवर होते.

मागील वर्षी देशाच्या कोळसा उत्पादनात विलक्षण चढ-उतार झाले होते. पण, यंदा कोळशाच्या उत्पादनात समाधानकारक वाढ झाली आहे. देशाला अंखड वीज पुरवठा करण्यासाठी कोळशाची गरज आहेच पण, पर्यावरण रक्षणासाठी कोळशाचा वापर कमी करून हरित ऊर्जेचा वापर वाढविण्याचीही गरज आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Coal production increased by eleven percent in the month of november pune print news mrj

First published on: 02-12-2023 at 10:57 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा