वृत्तसंस्था, तेल अविव

गाझामधील युद्धाला नऊ महिने पूर्ण होत असताना इस्रायलमधील नागरिकांनी रविवारी देशभरातील महामार्ग रोखून धरत पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना पायउतार होण्याचे आवाहन केले. तसेच हमासने ओलीस ठेवलेल्यांना परत आणू शकेल, अशा युद्धविरामाची मागणीही आंदोलकांनी केली.

आठवडय़ाच्या शेवटी हमासने युद्ध संपवण्याची इस्रायलची प्रमुख मागणी सोडल्याने आंतरराष्ट्रीय मध्यस्थांनी करार करण्यासाठी नूतनीकरणाचे प्रयत्न सुरू केले. त्यामुळे ही निदर्शने झाल्याचे इजिप्तशियन आणि हमासच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यामुळे नोव्हेंबरपासूनच्या लढाईला पहिला विराम मिळू शकतो आणि पुढील चर्चेसाठी व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते.

हेही वाचा >>>ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७ ऑक्टोबर रोजी सीमापार हल्ले केल्यानंतर पॅलेस्टिनी दहशतवादी गटाने सुरू केलेल्या युद्धात १ हजार २०० नागरिक ठार झाले तर २५० जणांना ओलीस ठेवले गेले. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने हवाई आणि जमिनीवर केलेल्या हल्ल्यात ३८ हजारहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. या युद्धामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊन मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी नागरिकांनी इस्रायलमधील मुख्य रस्ते अडवले आणि संसद सदस्यांच्या घराबाहेर निदर्शनेही केली. या युद्धात मारले गेलेले आणि अपहरण करण्यात आलेल्या नागरिकांच्या समर्थनार्थ गाझा सीमेजवळ इस्रायली निदर्शकांनी १ हजार ५०० काळे आणि पिवळे फुगे सोडले.