लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरातील भूमकर पुलाजवळ सोमवारी दुपारी खोबरेल तेल वाहतूक करणारा टँकर उलटला. टँकरमधून खोबरेल तेल पडल्याने मोठ्या प्रमाणावर तेलाचे पाट वाहू लागले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून, माती टाकून निसरडा झालेला मार्ग पूर्ववत केला. सुदैवाने अपघातात जिवित हानी झाली नाही. मात्र रस्त्यावर तेल वाहून मार्ग निसरडा झाल्याने बाह्यवळण मार्गावरील वाहतूक कमालीची संथ झाली.

Highway Traffic Management System on Pune-Mumbai Expressway to curb unruly traffic
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला आता सुधारणांचे ‘वळण’
Traffic jam due to beam collapse in Airoli
ऐरोलीत तुळई कोसळल्याने वाहतूक कोंडी
Azde, illegal building,
डोंबिवलीत आजदे गावात रस्ता बंद करून बेकायदा इमारतीची उभारणी, परिसरातील रहिवाशांचे येण्या-जाण्याचे मार्ग बंद
Road blocked on National Highway incident near Sassoonavghar
राष्ट्रीय महामार्गावर रस्ता खचला, ससूनवघर जवळील घटना; गाड्या पडल्या अडकून पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी
Panvel Karjat Railway Line , Wavarle Tunnel, Wavarle Tunnel on Panvel Karjat Railway Line, Excavation of Longest Wavarle, Excavation of Longest Wavarle Tunnel Completed, Mumbai railway,
पनवेल मार्गावरील वावर्ले या सर्वाधिक लांब बोगद्याचे खोदकाम पूर्ण, कर्जतसाठी पर्यायी रेल्वे मार्गिकेला गती
navi Mumbai drunk and drive marathi news
नवी मुंबई: आरटीओची ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई
mega block on Central and Western Railway on Sunday
मुंबई : रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर ब्लॉक
heavy vehicles banned for two weeks for repair work on ghodbunder road
घोडबंदर घाट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी दोन आठवडे अवजड वाहनांना बंदी; ठाणे, घोडबंदर, मुंबई अहमदाबाद मार्गावर कोंडीची शक्यता

आणखी वाचा-पुणे: बाजार समितीच्या अधिकाऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यावर मोर्चा

तामिळनाडूमधील कोईमतूरमधून २४ हजार लिटर खोबरे तेल घेऊन टँकर मुंबईकडे निघाला होता. नऱ्हे येथील भूमकर पुलावर टँकर चालकाचे सुटल्याने टँकर उलटला. गिअर बॉक्स निकामी झाल्याने टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुदैवाने अपघातात जिवीतहानी झाली नाही. टँकरमधील तेल पसरल्याने महामार्ग निसरडा झाला. सिंहगड, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलिसांसह वाहतूक विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्याचबरोबर पुणे महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

सिंहगड रस्ता, भारती विद्यापीठ पोलीस, वाहतूक पोलीस आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी मदतकार्य राबवल्याने संभाव्य दुर्घटना टळली. मात्र रस्त्यावर तेल वाहूम वाहतूक संथ झाल्याने बाह्यवळण मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. पाण्याचा मारा करून मार्ग स्वच्छ करण्यात आला. त्यावर माती टाकल्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.