पुण्यात दिवसभरात १ हजार ३१७ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ४७ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर, पिंपरी-चिंचवडमध्ये आज ९१४ करोनाबाधित वाढले असून, ५९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ४ लाख ५९ हजार ३०३ वर पोहचली आहे. तर आजपर्यंत ७ हजार ७०६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज २ हजार ९८५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ४ लाख ३१ हजार ८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९१४ बाधित रुग्ण आढळले असून, २ हजार ४६८ जण करोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ५९ रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून, यापैकी ४४ जण हे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या २ लाख ४१ हजार ७३४ वर पोहचली असून यापैकी, २ लाख २० हजार २५९ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ११३ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

COVID 19 : राज्यात दिवसभरात ५९ हजार ३१८ रूग्ण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ८९.७४ टक्के

राज्यात आता रोजच्या करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनातून बरे झालेल्यांची संख्या काही दिवसांपासून अधिक असल्याचे समोर येत आहे. मात्र ही बाब दिलासादायक असली तरी करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. शिवाय म्युकरमायकोसीस या आजाराचे रूग्ण देखील आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने लॉकडाउनचा कालावधी देखील वाढवलेला आहे. आज दिवसभरात राज्यात ५९ हजार ३१८ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ३४ हजार ३८९ नवीन करनोाबाधित आढळले आहेत. तर, ९७४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.