करोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. देशातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसागन दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरीदेखील राज्यातील काही भागात नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. पुण्यातदेखील अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे पुणेकरांनो आता तरी घरी बसा, असं म्हणायची वेळ आली आहे.

देशात करोनाग्रस्तांची दररोज वाढताना दिसत आहे. त्या दृष्टीने सरकार आणि प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पुकारलेला होता. त्याला जनतेने उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मात्र त्याच दरम्यान अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यावरून उतरून फटाके वाजवल्याच्या घटना घडल्या. त्याच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन जाहीर केला. त्यानंतर नागरी भागात जमाव बंदीचा आदेश देखील काढण्यात आला. या आदेशाला अवघे १२ तास उलटत नाही तोवर राज्यातील अनेक भागातील नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालंय अनेकांनी आवाहन करूनही नागरिकांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली.

आणखी वाचा- पुणे शहरातील वाहतूक दुपारी तीन नंतर थांबवणार – पुणे पोलीस

राज्यातील इतर भागांप्रमाणे पुण्यातदेखील नेहमीच्या वर्दळीच्या ठिकाणी मागील तीन दिवसापासून शुकशुकाट होता. परंतु आज या रस्त्यावरून नागरिक दुचाकीवरून फिरताना दिसले. त्यामुळे आता तरी पुणेकर नागरिकांनी घरी बसावे, अशी खऱ्या अर्थाने म्हणण्याची वेळ आली आहे.

Story img Loader