दगडूशेठ गणपती मंदिराच्या परिसरामध्ये नारळ विक्री आणि फुले विक्रीच्या अनधिकृत स्टॉलबाबत महापालिकेकडे आणि पोलिसांकडे तक्रार करूनही या स्टॉल्सवर कारवाई होत नसल्याचे या भागातील व्यावसायिक दीपक अगरवाल यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.
दगडूशेठ गणपती मंदिराच्या परिसरामध्ये नारळ, फुले विक्री करणारे अनधिकृत स्टॉल्स आहेत. या स्टॉल्सचे नारळाची पोती, फुलांची पोती असे सामान मंदिराच्या आणि या भागातील इतर दुकानांच्या परिसरामध्ये ठेवलेले असते. त्यामुळे मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने या भागातील अनधिकृत स्टॉल्स हटवणे आवश्यक आहे, अशी मागणी या भागातील व्यावसायिकांनी केली आहे. या भागातील अनधिकृत स्टॉल्स हटवण्यात यावेत अशी विनंती करणारे पत्र पुणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग आणि पुणे शहर पोलीस यांना देण्यात आले आहे. मात्र, तरीही या भागातील अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई होत नाही, असे अगरवाल यांनी म्हटले आहे.