scorecardresearch

Premium

पुणे : महापालिका भवन परिसरातील कोंडीमुळे वाहनचालकांना मनस्ताप

ई-बस महापालिका भवन येथील पीएमपी स्थानकात आल्यानंतर या भागातील वाहतूक विस्कळीत झाली.

Traffic in Chandni Chowk closed for two and a half hours at night
चांदणी चौकातील वाहतूक रात्री अडीच तास बंद (संग्रहित छायाचित्र)

महापालिका भवन परिसरात शुक्रवारी सायंकाळी वाहतूक कोंडी झाली. तासभर कोंडीत अडकून पडल्याने वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर ई-बस महापालिका भवन परिसरात आणण्यात आल्या.

ई-बस महापालिका भवन येथील पीएमपी स्थानकात आल्यानंतर या भागातील वाहतूक विस्कळीत झाली. जंगली महाराज रस्ता तसेच महापालिका भवन, कुंभारवाडा परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तासभर वाहनचालकांना कोंडीत अडकावे लागल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Due to the traffic in the pune muncipal carporarion area the drivers are suffering pune print news tmb 01

First published on: 02-09-2022 at 18:06 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×