दत्ता जाधव, लोकसत्ता

पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती, देशाअंतर्गत मागणीत झालेली वाढ आणि घटलेल्या उत्पादनाचा परिणाम म्हणून दुधाची मागणी अधिक आणि पुरवठा कमी, अशी स्थिती बाजारात निर्माण झाली आहे. त्यात भर म्हणून दूध पावडर निर्मिती वाढली आहे. अनेक लहान दूधसंघ तोटय़ातील पिशवी बंद दूध विक्री टाळून आपले दूध थेट पावडर निर्मितीसाठी विकत आहेत. तरीही राज्यात दूध टंचाई अजिबात नाही, गरजेइतके दूध उपलब्ध आहे, असा दावा दूध उद्योगाचे अभ्यासक प्रकाश कुतवळ यांनी केला आहे. 

inquiry committee set up to investigate rto scam
परिवहन विभागातील घोटाळ्याच्या तपासासाठी चौकशी समिती स्थापन
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
ow pressure water supply
दोन दिवस कमी दाबाने पाणी, मोरबे मुख्य जलवाहिनीवर आज १० तास देखभाल दुरुस्ती; नवी मुंबईसह कामोठे, खारघरलाही फटका

दूध पावडरचे दर ३००-३२० रुपये प्रतिकिलोंवर गेल्यामुळे पावडर निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक पातळीवरील व्यापार विस्कळीत झाला आहे. त्यामुळे युरोपीय देशातून जगभरात स्वस्त दरात होणारी दूध पावडरची विक्री विस्कळीत झाली आहे. त्यामुळे भारताच्या शेजारील देश आणि प्रामुख्याने आखाती देशातून पावडरची मागणी वाढली आहे. त्यामुळे देशातील मोठय़ा दूध संघांकडून पावडर निर्मितीवर भर दिला जात आहे. परिणामी जितके दूध उत्पादन होत आहे, तितक्या दुधाचा वापरही होत आहे. उन्हाळय़ामुळे दूध संकलनात घटही झाली आहे. त्यामुळे दुधाला मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी अवस्था निर्माण झाली आहे. तरीही बाजारात पिशवी बंद दुधाची कोणतीही कमतरता नाही. गरजेइतके पिशवी बंद दूध उपलब्ध आहे, अशी माहितीही कुतवळ यांनी दिली.

पावडर उत्पादन का वाढले?

दरवर्षी पावसाळय़ात दूध उत्पादनात वाढ झाल्यानंतर अतिरिक्त दुधाची पावडर केली जाते. पण, यंदा जागतिक मागणी वाढल्यामुळे ऐन उन्हाळय़ात दूध संकलनात घट झालेली असतानाही पावडर निर्मिर्ती केली जात आहे. त्याचा परिणाम बाजारातील दुधाच्या उपलब्धतेवर होताना दिसत आहे. आईस्क्रिम, मिठाई, बेकरी, औषध उद्योगांसह शंभरहून अधिक उत्पादनांसाठी दूध पावडरचा वापर  केला जातो. ज्या दुर्गम भागात ताज्या दुधाचा पुरवठा करणे शक्य नाही,  अशा ठिकाणी पावडरचा पुरवठा केला जातो.

थोडी माहिती..

आजघडीला राज्यात दररोज सुमारे १ कोटी ६० लाख लीटर दूध संकलन होते आहे. हे दूध आपल्या गरजेइतके आहे. गायीच्या १० लीटर दुधापासून १ किलो पावडर तयार होते. त्याशिवाय प्रक्रिया आणि पॉकिंगसाठी आणखी प्रती किलो २५ रुपयांचा खर्च येतो. सध्या गायीच्या दुधाची प्रतिलिटर ३५ रुपयाने शेतकऱ्यांकडून खरेदी होत आहे.

यंदा ऐन उन्हाळय़ातच मोठय़ा प्रमाणावर दूध पावडरचे उत्पादन होत आहे. त्यासाठी राज्यात संकलन होत असलेल्या एकूण दुधापैकी सुमारे ३० टक्के दुधाचा वापर केला जात आहे. दूध पावडरची देशांर्तगत मागणी वाढली आहे, मात्र, निर्यात वाढीसाठी आणि भविष्यात निर्यातीत सातत्य राहण्यासाठी नियोजन केले पाहिजे. सध्या बटरची निर्यात जास्त होत आहे. शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळतो आहे.  – प्रितम शहा, गोवर्धन डेअरी