पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात बुधवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सरकारी साक्षी, तसेच पुरावे सादर करण्याचे कामकाज संपले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याबाबतचा अर्ज ‘सीबीआय’ने न्यायालयात सादर केला. सीबीआयचे वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात बुधवारी (१३ सप्टेंबर) अर्ज सादर केला. सरकार पक्षाकडून नोंदविण्यात आलेल्या साक्ष, तसेच पुरावे सादर करण्याचे कामकाज संपले आहे, असे सीबीआयचे वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयात सांगितले.

हेही वाचा : दोन शाळा, एका महाविद्यालयाला संघाच्या बैठकीमुळे तीन दिवस सुटी

mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी

डाॅ. दाभोलकर हत्या प्रकरणात पुढील टप्प्यात आरोपींचे जबाब नोंदविले जाणार आहेत. त्यानंतर बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येणार आहेत. खटल्याची सुनावणी १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात सीबीआयने मुख्य आरोपपत्रासह पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.