लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: रास्त भाव दुकानातून ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध करून देण्याच्या केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री वाय-फाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस’ (पीएम-वाणी) उपक्रमात पुणे विभाग राज्यात अग्रणी आहे. या योजनेंतर्गत ४५०० दुकानांची सामान्य सुविधा केंद्रासाठी नोंदणी केली आहे. पुरवठा विभागामार्फत संपूर्ण राज्यभर हे काम करण्यात येणार आहे.

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
UPSC Recruitment for 147 Post Apply Online Candidates can check the notification online application link and salary
UPSC Recruitment 2024: यूपीएससी अंतर्गत ‘या’ १४७ पदांसाठी होणार भरती; २ लाखांपर्यंत मिळेल पगार, जाणून घ्या सविस्तर
New standards for facilities safety in nurseries
पाळणाघरांतील सुविधा, सुरक्षिततेबाबत नवीन मानके

पुरवठा विभागांतर्गत पुणे प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीनंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली. या योजनेद्वारे सार्वजनिक ठिकाणी वाय-फायची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा विनामूल्य असणार आहे. सार्वजनिक ठिकाणचे लहान दुकानदार त्यांचा व्यवसाय चालवीत असतानाच वाय-फाय राउटर खरेदी आणि स्थापन करतील. त्यामुळे या योजनेंतर्गत सार्वजनिक ठिकाणी असणारे नागरिक सतत इंटरनेटशी जोडले जाणार आहेत. पुणे विभागात ४५०० दुकानदारांनी नोंदणी केली आहे. ही योजना पुरवठा विभागाकडून राज्यभर विस्तारण्यात येणार आहे.

आणखी वाचा- धार्मिक आणि पर्यटन स्थळांची सफर घडविण्यासाठी पीएमपीची पर्यटन सेवा

दरम्यान, ई-वितरण प्रणाली सुरू करण्यासाठी लागणारे संगणक उपलब्ध करून दिले जातील, तसेच पुरवठा विभागाचा आकृतिबंध सुधारित करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल.वैधमापन विभागाने ग्राहकांचे नुकसान होणार नाही, यासाठी मोहीम स्तरावर बाजारातील वस्तूंचे मोजमाप घेऊन ते बरोबर असल्याची खात्री करावी. त्रुटी असलेल्या प्रकरणांत कारवाई करावी. वैधमापन कार्यालयाच्या वाढीव जागेसंदर्भात नव्याने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना चव्हाण यांनी प्रशासनाला केल्या.