विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यातील यश वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा अनेक गुणांवर अवलंबून असते. विद्यार्थ्य्यांनी ज्ञानाचा वापर करून नवीन मार्ग दाखवत देशाला जगात महासत्ता म्हणून घडवावे, असे मत भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख डॉ. सोमनाथ एस यांनी व्यक्त केले.
एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या पाचव्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. इंडियन केमिकल सोसायटीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू डॉ. मंगेश कराड, प्र-कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे: खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिन्यांची चोरी; वारजे भागातील घटना

union finance minister nirmala sitharaman interacted with students at deccan college
निर्मला सीतारामन यांना विद्यार्थिनीने विचारला प्रश्न… ‘तुम्ही कणखर कशा?’
Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…

याच कार्यक्रमात सामा टेक्नॉलॉजीज यूएसएचे संस्थापक सुरेश कट्टा यांना मानद डॉक्टरेट, डॉ. गणपती यादव भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्काराने गौरवण्यात आले. विद्यापीठातर्फे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील १६ विद्याशाखेतील २ हजार ३१५ विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तर ४५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

हेही वाचा >>>पुणे: बालकाशी अश्लील कृत्य करणारा केशकर्तनालयातील कारागीर गजाआड

डॉ. सोमनाथ म्हणाले, की सर्वांगिण शिक्षणाची संधी विद्यार्थ्यांना ध्येयप्राप्तीसाठी महत्वाची ठरेल. आजचे आधुनिक शिक्षण हे बदलणाऱ्या जगात ठामपणे उभे राहण्यास मदत करेल. समाजाच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी, देशाला सक्षम करण्यासाठी अवकाश तंत्रज्ञानाच्या वापरावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.