सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संग्रहातील दुर्मीळ चित्रांच्या जतनाचे काम तातडीने सुरू करण्याचा आदेश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. तसेच दुर्मीळ चित्रांचे विद्यापीठात खास दालन करून त्यात चित्रांची मांडणी करण्याची सूचनाही के ली. ‘मराठेशाहीपासूनचा दुर्मीळ चित्रठेवा धूळ-बुरशीत खितपत’ या वृत्ताद्वारे ‘लोकसत्ता’ने विद्यापीठातील दुर्मीळ चित्रांची अवस्था शनिवारी उजेडात आणली होती.

उदय सामंत यांनी सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाचे कु लगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह ऑनलाइन बैठक घेऊन चित्रांच्या जतनासंदर्भात सूचना दिल्या. राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा, विद्यापीठाचे कु लसचिव डॉ. प्रफु ल्ल पवार बैठकीला उपस्थित होते. सामंत म्हणाले, की विद्यापीठातील चित्रांच्या जतनाचे काम तातडीने सुरू करण्याची सूचना विद्यापीठाला देण्यात आली आहे. त्यासाठी जे. जे. स्कू ल ऑफ आर्ट्समधील तज्ज्ञ सहकार्य करतील, तसेच आवश्यक तो निधीही उपलब्ध करून दिला जाईल. विद्यापीठात खास दालन करून त्यात चित्रे मांडली जातील. मार्चच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. पुढील काही दिवसांत विद्यापीठात जाऊन संग्रहाचा आढावा घेणार आहे.

D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

विद्यापीठाकडून समिती

बैठकीनंतर सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाकडूनही माहिती देण्यात आली. २००८ मध्ये विद्यापीठाच्या ब्रिटिशकालीन वास्तूच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे इमारतीतील शस्त्रसामग्री, चित्रे, दिवे, झुंबरे, तोरणे आदी ऐतिहासिक वस्तू सुरक्षितपणे जतन करण्यात आल्या. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर या वस्तू मूळ जागी नेण्याचे प्रयत्न गेल्या दोन वर्षांत करण्यात आले. त्यानुसार ब्रिटिशकालीन तीन मोठी झुंबरे ज्ञानेश्वर सभागृहात बसवण्यात आली. त्यासाठी देशभरातून कारागिरांचा शोध घेऊन हे काम करण्यात आले. तसेच शोभिवंत दिवेही पुन्हा लावण्यात आले. पेशवाईतील अनेक शस्त्रसामग्रीची आवश्यक ती दुरुस्ती करून विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत संग्रहालय करण्यात आले. विद्यापीठातील भुयाराचा जीर्णोद्धारही करण्यात आला. कु लगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या संकल्पनेतून नागरिकांसाठी हेरिटेज वॉकही सुरू करण्यात आला. विद्यापीठाकडे असलेल्या तैलचित्रांपैकी काही चित्रे पुन्हा जागेवर लावण्यात आली आहेत. तर पेशव्यांचे चित्र, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या चित्रांच्या दुरुस्तीसाठी जानेवारी २०२०मध्ये पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करून दुरुस्तीची योजना तयार करण्यात आल्याचे कु लसचिव डॉ. प्रफु ल्ल पवार यांनी सांगितले.

पुरातत्त्व संचालनालयाची तयारी

सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठातील चित्रांच्या संवर्धनासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची पुरातत्त्व संचालनालयाची तयारी आहे. त्यासाठी वर्षभरापूर्वी चित्रांचे संवर्धन करण्यासंदर्भात विद्यापीठाशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र विद्यापीठाकडून प्रतिसाद देण्यात आला नाही. आता पुन्हा एकदा विद्यापीठाला या बाबतीत संपर्क साधून चित्रांचे संवर्धन करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे राज्याच्या पुरातत्त्व संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सांगितले.