मनोज मोरे, एक्सप्रेस वृत्त

पुणे : येथील ‘ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट’चे (पूर्वीचा ओशो किंवा-रजनीश आश्रम) संचालन करणाऱ्या ‘ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन’ला (ओआयएफ) कोरेगाव पार्क या उच्चभ्रू परिसरातील दोन भूखंड विक्रीसाठीची परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबईतील सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाने या संदर्भातील अर्ज नाकारला आहे.  या विक्री व्यवहारास दिवंगत आध्यात्मिक गुरू ओशोंच्या शिष्यांच्या एका गटाचा तीव्र विरोध आहे.

maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mumbai Ravi Raja opposed for Municipal administration decided to tax commercial slums
व्यावसायिक स्वरुपाच्या झोपड्यांना मालमत्ता कर लावण्यास विरोध, माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांचे आयुक्तांना पत्र
Employee Stress , App , Pune Municipal corporation ,
कर्मचाऱ्यांच्या ताणावर ॲपची मात्रा ! पुणे महापालिका प्रशासनाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव
Traffic rules Vietnam, Traffic rules reward ,
विश्लेषण : वाहतूक नियम मोडणारे दाखवा नि बक्षीस मिळवा… व्हिएतनाममधील अनोख्या उपायाची भारतातही नेटकऱ्यांमध्ये काय चर्चा?
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
maharashtra FASTag mandatory all vehicles
विश्लेषण : राज्यात १ एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक… नेमके काय होणार?
Maharashtra Sadan not available for Sahitya Sammelan Delay for four months on fee issue Nagpur news
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मिळेना! शुल्काच्या मुद्द्यावर चार महिन्यांपासून खल

हेही वाचा >>> इंद्रायणी तांदळाच्या उत्पादनात घट

‘ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन’ने (ओआयएफ) ‘ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट’मधील सुमारे नऊ हजार ८०० चौरस मीटरचे दोन भूखंड विकण्याची परवानगी मागितली होती. या भूखंडांची उद्योगपती राहुल बजाज यांच्या कुटुंबाच्या विश्वस्त मंडळाला (ट्रस्ट) १०७ कोटींना विक्री होणार होती. मात्र, ओशोंच्या शिष्यांच्या बंडखोर गटाने या व्यवहारास तीव्र आक्षेप घेतला होता. ‘ओआयएफ’चे विश्वस्त आध्यात्मिक गुरू ओशोंचा आश्रमरूपी वारशाला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा या गटाचा आरोप आहे. या विक्री व्यवहारास परवानगी नाकारताना सहधर्मादाय आयुक्त आर. यू. मालवणकर यांनी ७ डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशात ‘राजीवनयन राहुलकुमार बजाज आणि ऋषभ फॅमिली ट्रस्ट’कडून मिळालेली ५० कोटीं रुपयांची आगाऊ रक्कम (इसारा) व्याजाशिवाय परत करावी, असे नमूद केले आहे.

Story img Loader