संजय भगत यांच्याकडून पदरमोड करून मराठी भाषेची सेवा

मराठी पारिभाषिक कोशातील दोन लाख ६७ हजार शब्द इंटरनेटवर टाकण्यात आले असून या शब्दांचा जगभरातील लोकांना भाषांतरासाठी उपयोग होत आहे. अर्थात हे काम सरकारी पातळीवर झालेले नाही, तर संजय भगत या सामान्य माणसाने पदरमोड करून हे काम करताना भाषेची सेवा केली आहे.

Creation of a special website for the deaf
मुंबई : कर्णबधिरांसाठी विशेष संकेतस्थळाची निर्मिती
Maharashtra Din 2024 Wishes in Marathi
Maharashtra Day Wishes: महाराष्ट्र दिनाच्या व मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा पाठवून गाऊ गाथा गौरवाची, पाहा शुभेच्छापत्रांची यादी
balmaifal story for kids why we celebrate gudi padwa as a new marathi year
बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक

मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी या उद्देशातून ६ जुलै १९६० रोजी मराठी भाषा संचालनालयाची स्थापना करण्यात आली. संचालनालयातर्फे विविध विषयांवरील पारिभाषिक शब्दांचा समावेश असलेल्या राज्य मराठी कोश निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला. १९९५ पर्यंत विविध विषयांवरील ३५ कोशांची सिद्धता झाली होती. मात्र, सरकारी पातळीवर झालेले हे मूलभूत काम अनास्थेमुळे समाजापर्यंत पोहोचू शकले नाही. २००१ मध्ये इंटरनेट या आधुनिक माध्यमाचा वापर करून हे कोशातील ज्ञान जगभरातील सर्वाना खुले करून देण्याचा संजय भगत यांनी संकल्प केला. २००८ पर्यंतच्या कालावधीत त्यांनी पदरमोड करून एकहाती दोन लाख ६७ हजार शब्दांचा समावेश असलेले हे कोश इंटरनेटवर टाकले. विविध विषयांवरील मराठी पारिभाषिक शब्दांचे हे भांडार  marathibhasha.org  या संकेतस्थळाच्या माध्यमातून जगभरातील भाषा अभ्यासकांसाठी खुले झाले आहे. १०८ देशांतील किमान १५ हजार लोक दररोज या संकेतस्थळाला भेट देत आहेत. त्यांना भाषांतराचे काम करताना मराठीतील या पारिभाषिक शब्दांचा उपयोग होत असल्याने मी केलेल्या कामाचे सार्थक झाले, अशी भावना संजय भगत यांनी व्यक्त केली. मराठी भाषेबद्दल साऱ्यांनाच प्रेम आहे, पण निव्वळ बोलून ते व्यक्त होणार नाही, तर त्यासाठी काही तरी कृती केली पाहिजे या जाणिवेतून मी हे काम केले.

भाषेच्या दुधावर मी पोसलो आहे. त्या भाषेच्या ऋणातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे संजय भगत यांनी सांगितले. कोश हे समाजाचे धन असून विविध विषयांचा समावेश असलेले हे कोश संकेतस्थळावर टाकण्यासाठी परवानगीची आवश्यकता नव्हती. मात्र, ज्ञान जगापर्यंत पोहोचविण्यासाठी इंटरनेटचा उपयोग करून घेण्याचे मी ठरविले आणि सात-आठ वर्षांत हे काम पूर्णत्वास नेऊ शकलो याचा आनंद आहे. या कामाचा जगभरातील लोकांना फायदा होत आहे, याचे समाधान वाटते, असेही भगत यांनी सांगितले.