पिंपरी : महापालिकेच्या अटी-शर्तीवर कमी दरात मिळाले तर राज्य शासनाच्या मान्यतेने कर्ज घेण्याचे नियोजन आहे. त्याचे अनेक टप्पे आहेत. त्याची प्रक्रिया सुरु आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे सांगतानाच बचत ठेवी भरपूर आहेत म्हणत नेमकी माहिती देण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी नकार दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त सिंह म्हणाले, कोणतीही करवाढ, दरवाढ केली नाही. मालमत्तांचे सर्वेक्षण सुरु आहे. आत्तापर्यंत पाच लाख ४७ हजार ५४५ मालमत्तांना क्रमांक देण्यात आला आहे. कर आकारणी न झालेल्या एक लाख ६२ हजार ३२८ मालमत्ता आढळल्या आहेत. त्याचे प्रमाण ३० टक्के आहे. सर्वेक्षणात कर आकारणी न झालेल्या अडीच लाख मालमत्ता आढळण्याची शक्यता आहे. या मालमत्तांची नोंद करुन त्यांना कर कक्षेत आणले जाणार आहे. त्यामुळे मालमत्ताकराचे उत्पन्न १२०० कोटींपर्यंत जाईल. तसेच थकीत कर वसुलीला प्राधान्य देण्यात आले आहे.

हेही वाचा…‘बालभारती’चे समृद्ध ग्रंथालय आता सर्वसामान्यांसाठीही खुले, दुर्मीळ पुस्तके, ग्रंथांचे वाचन शक्य

स्थानिक संस्था कर विभागाकडे (एलबीटी) नोंदणी केलेल्या शहरातील व्यावसायिकांसाठी राज्य शासनाच्या मान्यतेने ‘अभय योजना’ लागू करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी केल्यानंतर या विभागाकडून सुमारे ५०० कोटी रुपयांचा एलबीटी वसूल होईल. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भरीव वाढ होईल.

भामा आसखेड, आंद्रा प्रकल्पाद्वारे पाणी आणण्याच्या कामाला गती दिली आहे. भामा आसखेड धरणाजवळ मौजे वाकी तर्फे वाडा येथे अशुद्ध जलउपसा केंद्र बांधण्यात येणार आहे. त्यासाठी जॅकवेलसह पंप हाऊस, ब्रिज, इंटेक चॅनल बांधणे व इतर अनुषंगिक कामे करणे हे काम विद्युत यांत्रिकी स्काडा आणि उर्वरित कामांचा समावेश आहे. सेक्टर २३ जलशुध्दीकरण केंद्रापासून सांगवी – दापोडीपर्यंत जलवाहिनी टाकल्याने सांगवी – दापोडी सारख्या शेवटच्या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

हेही वाचा…पुणे : बुधवार पेठेत जुन्या वाड्याची भिंत कोसळली; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे दोघांचे प्राण वाचले

तसेच महामार्गालगतच्या चिंचवड, आनंदनगर झोपडपट्टी, मोहननगर, मोरवाडी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, जुनी सांगवी या भागास त्याचा लाभ होईल. वाढीव पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. प्रत्येक घराला मीटर सहित नळजोडणी, घोषित झोपडपट्यांमधील प्रत्येक घराला मीटर विरहित नळजोडणी देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal commissioner refuse to give exact information about saving deposits of pcmc pune print news ggy 03 psg