घरगुती चवीचे, ताजे पदार्थ हे न्यू रुचिरा हॉटेलचं वैशिष्टय़ं. घडीच्या आणि तव्यावर घरगुती पद्धतीनं आपल्या समोरच तयार होणाऱ्या गरम गरम पोळ्या ही इथली खासियत आहे. वेगवेगळ्या भाज्यांसह इतरही कितीतरी पदार्थ इथल्या थाळीत दिले जातात. शिवाय, पाव भाजी, छोले भटुरे तसंच गुलाबजाम, पुरणपोळी असे इथले कितीतरी पदार्थ असे आहेत जे आवर्जून घेतले जातात.

चांगलं जेवण कुठे मिळेल ही चर्चा नेहमीच सुरू असते. अशा मंडळींसाठी वाळवेकरनगरमध्ये असलेलं ‘न्यू रुचिरा’ हे हॉटेल हा एक मस्त स्पॉट आहे. घरगुती चव हे वैशिष्टय़ं या हॉटेलमध्ये प्रत्येक पदार्थात जपलं जातं. त्यामुळे चविष्ट आणि तरीही फार तिखट नाहीत, फार तेलकट नाहीत असे इथले सगळे पदार्थ असतात. फक्त जेवणच नाही तर नाश्त्यासाठी आणि वेगवेगळे पराठे खाण्यासाठीही इथे येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. चवदार, ताजे पदार्थ आणि वाजवी दर असं हे ठिकाण असल्यामुळे त्यासाठी इथे अवश्य भेट द्यायला हवी.

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून

महेंद्र आणि जितेंद्र शर्मा यांनी आठ-दहा वर्षांपूर्वी हे हॉटेल सुरू केलं. ते सुरू करताना या व्यवसायाची तशी कोणतीही पाश्र्वभूमी शर्मा कुटुंबात नव्हती. हे दोन्ही भाऊ, त्यांचे वडील सुभाष हे सगळे अन्य व्यवसायात होते. तरीही आपल्याला हा व्यवसाय जमेल असा विश्वास या मंडळींना होता आणि त्यातून न्यू रुचिरा हे हॉटेल सुरू झालं. सुरुवातीला अगदी मोजकेच पदार्थ इथे तयार केले जायचे. त्यात मुख्यत: पोळी भाजी, दोन-तीन प्रकारचे पराठे आणि दाल राईस एवढय़ाच पदार्थाचा समावेश होता. हे मोजके पदार्थ दिले जात होते तरीही इथे येणाऱ्यांना हे पदार्थ पसंतीला पडले. मुख्य म्हणजे पदार्थ ताजे दिले जायचे आणि त्यांची चव. त्यामुळे इथे येणाऱ्यांनीच एकेक पदार्थ सुचवायला सुरुवात केली आणि त्यानुसार इथल्या पदार्थाची यादी वाढत गेली. त्यातले काही पदार्थ रविवारी केले जातात किंवा कोणी मागणी केली तर केले जातात आणि काही पदार्थ रोज उपलब्ध असतात. त्यात गोड पदार्थही आहेत.

रोजच्या पदार्थामध्ये नाश्त्यासाठी मिसळ उपलब्ध असते. तसंच आलू, कोबी या पराठय़ांसह अनेकविध चवींचे पराठे इथे मिळतात. ते दह्य़ाच्या वाटीबरोबर दिले जातात. जेवणातही इथे चांगलं वैविध्य आहे. फूल थाळी, मीडियम थाळी आणि मिनी थाळी असे थाळीचे तीन प्रकार उपलब्ध असल्यामुळे आपल्या चवीनुसार आणि आवडीनुसार आपण त्यातले पदार्थ पाहून काय घ्यायचं ते ठरवू शकतो. मुळातच इथले पदार्थ म्हणजे विशेषत: भाज्या वगैरे मेन्यू रोजचा बदलता असल्यामुळे

पैसे देण्याच्या काउंटरवर गेल्यानंतर तिथे असलेल्या फळ्यावर आज काय काय केलयं हे आधी बघितलं जातं आणि मग प्रत्येक जण काय काय घ्यायचं ते ठरवतो.

इथल्या व्हेज थाळीमध्ये मुख्यत: घडीच्या तीन पोळ्या, रस्सा भाजी, रस्सा उसळ, सुकी भाजी, कोशिंबीर, सॅलड, लोणचं, चटणी, ताक, मसाले भात किंवा व्हेज पुलाव, एक गोड पदार्थ आदी पदार्थ दिले जातात. इथली पाव भाजीही आवर्जून घेतली जाते आणि छोले भटुऱ्यांनाही चांगली मागणी असते. मुख्य म्हणजे आपल्या समोर भटुरा म्हणजे मोठी पुरी तयार होताना पाहणं हा इथला अनेकांच्या आवडीचा प्रकार. गरम गरम पुऱ्या आणि बरोबर छोले अशी इथली डिश. पोळी किंवा पराठे आपण ऑर्डर दिल्यानंतर तयार करून दिले जात असल्यामुळे गरम गरम पदार्थ अगदी काही मिनिटात इथे आपल्याला मिळतात. मसाले भात, पुलाव, जिरा राईस, दाल राईस, तवा पुलाव असे भाताचेही अनेक प्रकार इथे दिले जातात. शिवाय पुरणपोळी, गुलाबजाम, बासुंदी, रबडी अशा नेहमी मिळणाऱ्या पदार्थाबरोबरच शेंगदाणे, गूळ आणि तिळाची शेंगदाणा पोळी आणि इतरही काही पदार्थ इथे विशिष्ट प्रसंगी मिळतात. सुरळी वडी, कोथिंबीर वडी असेही काही पदार्थ इथे घेता येतात. शिवाय इथे खाण्याबरोबरच इथून डबा किंवा पोळी भाजी किंवा पार्सल नेणारेही खूप जण आहेत.

हे सगळे पदार्थ तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो अतिशय चांगला आणि दर्जेदार असाच घेतला जातो. तोही त्या त्या किराणा, भुसार मालासाठी जे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत त्यांच्याकडूनच या साहित्याची खरेदी केली जाते. त्यामुळे जे पदार्थ तयार होतात ते चांगले होतात. शिवाय ते ताजे ताजे आणि गरम गरम असेच दिले जातात. त्यामुळे चविष्ट पदार्थाचा अनुभव इथे येणाऱ्यांना नक्कीच येतो.

कुठे आहे?

  • ट्रेझर पार्क, वाळवेकर नगर, सातारा रस्त्याजवळ संपर्क: २४२०३०३५

केव्हा?

  • सकाळी नऊ ते रात्री अकरा सोमवारी बंद