scorecardresearch

जेजुरी : निर्मला सीतारामन जेजुरीत खंडोबा गडावर ; खंडोबाचा तळी-भंडारा करून भंडार खोबरे उधळले

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर येऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (२३ सप्टेंबर) देवाचे दर्शन घेतले.

जेजुरी : निर्मला सीतारामन जेजुरीत खंडोबा गडावर ; खंडोबाचा तळी-भंडारा करून भंडार खोबरे उधळले
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर येऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देवाचे दर्शन घेतले

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर येऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (२३ सप्टेंबर) देवाचे दर्शन घेतले. खंडोबाचा तळी-भंडारा करून सदानंदाचा येळकोट म्हणत भंडार खोबरे उधळले. कुलधर्म-कुलाचार झाल्यावर वाघ्या मुरळींनी संबळ वाजवून जागरण गोंधळाचे गाणे म्हणले.तर गडामध्ये असलेला ऐतिहासिक ४२ किलो वजनाचा खंडा (तलवार) उचलण्याचे प्रात्यक्षिकही त्यांनी पाहिले.

हेही वाचा >>>Ghatsthapana 2022: कधी आहे घटस्थापना? जाणून घ्या शुभ मुहूर्त

श्री मार्तंड देवस्थानचे मुख्य विश्वस्त तुषार सहाणे, राजकुमार लोढा, पंकज निकोडे, प्रसाद शिंदे, अशोक संकपाळ यांनी त्यांचे खंडोबाची मूर्ती देऊन स्वागत केले. आमदार राहुल कुल, माजी मंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, आमदार राम शिंदे, बाळा भेगडे, बाळासाहेब गावडे, गिरीश जगताप, बाबाराजे जाधवराव, सचिन लंबाते, जालिंदर कामठे, जेजुरी भाजपाध्यक्ष सचिन पेशवे आदी त्या वेळी उपस्थित होते. प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलीस निरीक्षक उमेश तावस्कर हेही गडावर आले होते.

हेही वाचा >>> पुणे : रस्त्यांची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना अभय पथ विभागाच्या शिफारशीमध्ये आयुक्तांकडून बदल

खंडोबा गडावर निर्मला सीतारामन यांनी पुजाऱ्यांशी संवाद साधून त्यांची निवेदने स्वीकारली. त्यानंतर मोरगाव रस्त्यावरील कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले.

मराठीतील सर्व पुणे न्यूज ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nirmala sitharaman visited khandoba fort in jejuri pune print news amy

ताज्या बातम्या