पुणे : कौटुंबिक वाद अथवा शहराचे आकर्षण यामुळे अनेक मुले घर सोडून पळून जातात. ही मुले ही रेल्वेगाड्यांत अथवा स्थानकांवर आश्रय घेतात. अशा एक हजारहून अधिक मुलांची पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घडविण्याची कामगिरी रेल्वे सुरक्षा दलाने वर्षभरात केली आहे. त्यात पुणे विभागाने २१० मुलांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविले आहे.

रेल्वे सुरक्षा दलाने ‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेंतर्गत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेवरील स्थानकांतून लोहमार्ग पोलीस आणि इतर रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने १ हजार ६४ मुलांची सुटका केली. स्थानकावर अथवा गाड्यांमध्ये फिरणाऱ्या अशा मुलांना जवानांनी शोधले. त्यांच्याशी संवाद साधून जवान त्यांना बोलते केले. त्यानंतर त्या मुलांनी घर सोडल्याचे सांगितले. चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने या मुलांची पालकांशी पुन्हा भेट घडवण्यात आली.

Dilemma of onion growers for 14 months in last five years
गेल्या पाच वर्षांतील १४ महिने कांदा उत्पादकांची कोंडी
mumbai traffic police marathi news
मुंबई: बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम, २ हजार १८९ दंडात्मक कारवाया
Nagpur Police, 11 Robbers, Three Crore Rupee Jewelry Heist, robbery in nagpur, nagpur robbery, crime in nagpur, one woman hostage by robbers,
एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?

आणखी वाचा-खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला अजित पवार आले, पार्थ पवार येणार?

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने सर्वाधिक ३१२ मुलांची सुटका केली. त्याखालोखाल मुंबई विभागाने ३१२ मुलांची सुटका केली. पुणे विभागाने २१० मुलांची सुटका केली असून, नागपूर विभागाने १५४ आणि सोलापूर विभागाने ७५ मुलांची सुटका केली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.