scorecardresearch

Premium

पुणे : पीएमपी ठेकेदारांचा संप सुरूच ; होळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना फटका

भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थपकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना भेटणार आहेत.

पुणे : पीएमपी ठेकेदारांचा संप सुरूच ; होळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना फटका

थकीत रक्कम मिळावी, या मागणीसाठी पीएमपीने भाडेकरार केलेल्या खासगी ठेकेदारांनी पुकरलेला संप सोमवारी कायम राहिला. पीएमपी प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातील प्राथमिक चर्चा निष्फळ ठरली. सोमवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात केवळ ९५४ गाड्या संचलनात असल्याने या दोन्ही शहरातील प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला. होळीच्या सणासाठी बाहेरगावी जाणा-या प्रवाशांना अन्य वाहतूक पर्यायांचा वापर करावा लागला.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थपकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना भेटणार आहेत. ठेकेदारांबरोबर चर्चा सुरू असून सायंकाळपर्यंत संप मिटेल, असा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

prabhakar devdhar
इलेक्ट्रॉनिक आयोगाचे माजी अध्यक्ष देवधर यांचे निधन; ‘अ‍ॅप्लॅब इंडिया’चे संस्थापकप्रवर्तक
Mallikarjun Kharge writes to Mamata Banerjee requesting security for Bharat Jodo Nyaya Yatra
‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरक्षा पुरवावी! मल्लिकार्जुन खरगे यांची ममता बॅनर्जीना पत्र लिहून विनंती
The mystery of firing on the motor vehicle inspector increased Nagpur
मोटार वाहन निरीक्षकावरील गोळीबाराचे गुढ वाढले
prakash ambedkar amravati marathi news, prakash ambedkar show of strength marathi news,
काँग्रेसच्या प्रभावक्षेत्रात वंचित बहुजन आघाडीचे शक्तिप्रदर्शन

हेही वाचा >>> पुणे : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या अडीच वर्षांच्या बालिकेचा खून; आईसह प्रियकर अटकेत

पीएमपीच्या ठेकेदरांनी  रविवारी दुपार पाळीपासून अचानक संप पुकारला आहे. यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील बहुतांश गाड्या मार्गावर धावू नसून पीएमपीने स्वमालकीच्या गाड्यांद्वारे सेवा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यात पीएमपीच्य स्वम्लकीच्या ८२९ गाड्या असून भाडेकरारावरील १२५ गाड्यांचा समावेश आहे. निम्म्याहून अधिक गाड्या मार्गावर न आल्याने  पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. मुळातच प्रवासी संख्या पहाता पीएमपीच्या ताफ्यात अपुऱ्या गाड्या आहेत.  संचलन तूट आणि अन्य रक्कम पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी थकीत रक्कम द्यावी, यासाठी हा संप पुकारण्यात आला असून पीएमपी प्रशासनाकडून ठेकेदारंबरोबर प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. संप न मिटल्यास इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>पुणे : खबऱ्याला पोलीस हवालदाराकडून शिवीगाळ; निलंबनाचे आदेश

 मे. ट्रॅव्हल टाईम मोबिलिटी इंडिया प्रा.लि., मे. ॲन्टोनी गॅरेजेस प्रा.लि., मे.हन्सा वहन इंडीया लि., मे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि., मे. ईव्ही ट्रान्स प्रा. लि. आणि  मे. ओहा कम्युट प्रा. लि. यांनी संपात सहभाग घेतलेला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून निधी उपलब्ध होणेबाबत मागणी करण्यात आली आहे. पीएमपी प्रशासनाने पंधरा मार्च २०२३ पर्यंत संबंधित ठेकेदारांची देयके देण्यात येणार असून तसे पत्र पीएमपीकडून ठेकेदारांना देण्यात आले आहे.  मात्र संप कायम राहिल्याने सोमवारी प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pmp contractors strike continue on monday pune print news apk 13 zws

First published on: 06-03-2023 at 12:45 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×