खासगी वित्तीय संस्था तसेच शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाने व्यावसायिकाची तब्बल ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक रमेश शिंदे (वय,२७ रा.बाणेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात असून, याबाब एका व्यावसायिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शिंदे आणि व्यावसायिकाची काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. खासगी वित्तीय संस्था, शेअर बाजारातील गुंतवणूक तज्ज्ञ ओळखीचे असल्याची बतावणी शिंदेने व्यावसायिकाकडे केली होती. तसेच, गुंतवणुकीवर जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष देखील शिंदेने व्यावसायिकाला दाखविले होते.

BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
dawood ibrahim marathi news, extortion dawood ibrahim marathi news
खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

यानंतर त्या व्यावसायिकाकडून वेळोवेळी करून शिंदेने तब्बल ४८ लाख रुपये घेतले आणि त्यांना परतावा मात्र दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.