अधिसभेतील ठरावाची अंमलबजावणी प्रलंबित

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, अधिसभेचे ठराव, इतिवृत्ते आदी माहितीची विद्यापीठ प्रशासनाकडून दडवणूक सुरूच आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अधिसभेत ही माहिती-कागदपत्रे संकेतस्थळावर जाहीर करण्याबाबत झालेल्या ठरावाची विद्यापीठ प्रशासन अंमलबजावणी का करत नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठासह काही विद्यापीठांकडून ही कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातात. विद्यापीठ प्रशासनकडून घेतले जाणारे निर्णय, अधिसभेतील ठराव, कार्यक्रमपत्रिका, व्यवस्थापन परिषदेचे ठराव, इतिवृत्त याची माहिती संकेतस्थळावर करून देण्याबाबत विद्यापीठाकडे अनेकदा मागणी करण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विद्यापीठाच्या अधिसभेत ठराव, निर्णय, इतिवृत्ते संके तस्थळावर उपलब्ध करून देण्याबाबत ठराव मान्य होऊनही त्याबाबतची कार्यवाही प्रलंबित कशासाठी, कामकाजात गोपनीयता ठेवण्याचे कारण काय असे प्रश्न उपस्थित के ले जात आहेत.

Mumbai University job hiring 2024 post
Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठात भरती! ‘या’ पदांसाठी लगेच करा अर्ज….
corruption in academic research
संशोधन कमी आणि बाजार जास्त!
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात

विद्यापीठाच्या कामकाजात पारदर्शकता राहण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने व्यवस्थापन परिषद, अधिसभेतील ठराव, इतिवृत्ते सार्वजनिक केली पाहिजेत. विद्यापीठाचे निर्णय विद्यार्थ्यांसह सर्वानाच कळायला हवेत. विद्यापीठ अनुदान आयोगाची इतिवृत्ते, राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय संकेतस्थळावर जाहीर होतात. मग विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, अधिसभेतील ठराव, इतिवृत्ते कार्यक्रम पत्रिका संकेतस्थळावर जाहीर करायला अडचण काय, अधिसभेतील ठरावाची अंमलबजावणी करायला विद्यापीठ प्रशासन हतबल का आहे, असे प्रश्न अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांनी उपस्थित केले. अधिसभेत झालेल्या ठरावानुसार विद्यापीठ प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येईल, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले.

प्रत्यक्ष अधिसभेबाबत निर्णय ?

विद्यापीठाची मार्चमध्ये झालेली अर्थसंकल्पीय अधिसभा अर्थसंकल्पाबाबत चर्चा न होता स्थगित करताना चर्चेसाठी स्वतंत्र आणि प्रत्यक्ष स्वरूपात अधिसभेचे आश्वासन देण्यात आले होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असल्याने अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी  प्रत्यक्ष अधिसभेची मागणी अधिसभा सदस्यांनी केली आहे. त्यामुळे आज (२५ जून) होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रत्यक्ष अधिसभेबाबत निर्णय होणार का, असाही प्रश्न आहे.

प्रशासनात पारदर्शकता राहण्यासाठी विद्यापीठाने ठराव, निर्णय, इतिवृत्ते जाहीर करणे आवश्यक आहे. महापालिकेचेसुद्धा ठराव, सर्वसाधारण सभेची कार्यक्रमपत्रिका संकेतस्थळावर जाहीर  होतात. विद्यापीठ प्रशासनच कामकाजातील पारदर्शकता दाखवणार नसेल, तर महाविद्यालये, विद्यार्थ्यांसमोर पारदर्शकतेचा काय आदर्श ठेवणार? त्यामुळे विद्यापीठाने तातडीने सर्व माहिती संकेतस्थळावर नियमितपणे प्रसिद्ध केली पाहिजे या अपेक्षेत काहीही वावगे नाही.

– विवेक वेलणकर, माहिती अधिकार कार्यकर्ते

अधिसभेत झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत पाठपुरावा करण्यात येईल. या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचना द्यावी, अशी विनंती कुलगुरूंना केली जाईल.

– राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ