ऑफलाइन परीक्षेत अडचणी येऊ नये यासाठी मनुष्यबळात वाढ

पुणे : अंतिम वर्ष परीक्षांमध्ये उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी रोखण्यासाठी सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाची धडपड सुरू आहे. ऑनलाइन, ऑफलाइन परीक्षेत तांत्रिक अडचणी उद्भवू नये यावर लक्ष देण्यासाठी विद्यापीठाला परीक्षेसाठीच्या मनुष्यबळात वाढ करावी लागली आहे.

सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाकडून १२ ऑक्टोबरपासून अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास सुरुवात झाली. मात्र पहिल्या दोन दिवसांतच प्रश्नपत्रिके तील आकृत्या न दिसणे, प्रश्नपत्रिके तील प्रश्न न दिसता उत्तरांचे पर्याय दिसणे, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका येणे अशा अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्या. तर ऑफलाइन परीक्षेत टंकाच्या अडचणींमुळे प्रश्नपत्रिका वाचता न येणे, परीक्षा वेळेत सुरू न होणे असे प्रकार झाले. त्यामुळे दोन दिवसांत काही परीक्षा पुढे ढकलून १७ ऑक्टोबरला घेण्याची वेळ विद्यापीठावर आली. या प्रकारांनी विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. पहिल्या दोन दिवसांतील अनुभवांमुळे विद्यापीठाने उर्वरित परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी रोखण्यावर लक्ष ठेवण्यासाठी मनुष्यबळात वाढ के ली आहे.

विद्यापीठाचे कु लगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, की पहिल्या दोन दिवशीच्या अनुभवांवरून परीक्षेसाठीच्या मनुष्यबळात वाढ के ली. आठ चमू कार्यरत आहेत. प्रश्नपत्रिका वेळेत पोहोचणे, प्रश्नपत्रिकांत चुका न राहण्यासाठी त्या परीक्षेपूर्वीच प्रत्यक्ष तपासण्यापासून ऑनलाइन परीक्षेसाठीची सर्व प्रक्रिया या कडे बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. हेल्पलाइनद्वारेही विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या जात आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणी कमी होतील  याचा विश्वास आहे.

तिसऱ्या दिवशी अडचणींमध्ये घट

परीक्षेच्या तिसऱ्या दिवशी तांत्रिक अडचणींमध्ये घट झाल्याचे दिसून आले. बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या मराठी विषयाच्या परीक्षेला जवळपास तीन तास उशीर झाला. तर राज्यशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यानही प्रश्न न दिसण्यासारख्या तांत्रिक अडचणी उद्भवल्या. मात्र पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत तक्रारींचे प्रमाण कमी झाले. तिसऱ्या दिवशी ऑनलाइन परीक्षेसाठी ५८ हजार ८२७ विद्यार्थी अपेक्षित होते. त्यापैकी ५० हजार ७९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ऑफलाइन परीक्षेसाठी नोंदणी के लेल्या १९ हजार ७२४ विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ४३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

विशेष परीक्षेची संधी

तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून विशेष परीक्षेद्वारे संधी दिली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज भरून द्यायचा आहे. नोंदणी अर्ज विद्यापीठाच्या संके तस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.