पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींवर रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या महिनाभरात या दोन घटना घडल्या आहेत. यातील एक विद्यार्थिनी सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी असून, ती क्ष-किरणशास्त्र विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. दुसरी विद्यार्थिनी भूलशास्त्र विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालय मागील काही काळापासून चुकीच्या घटनांमुळे चर्चेत आहे. महाविद्यालयात वारंवार घडणाऱ्या गैरप्रकारांमुळे त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे. त्यातच आता गेल्या महिनाभरात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर रॅगिंग झाल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रॅगिंगचा गंभीर प्रकार घडूनही महाविद्यालय प्रशासनाकडून या दोन्ही प्रकारांबाबत मौन बाळगून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

shalini patil vishal patil
शालिनी पाटलांनी नातू विशाल पाटलांचे कान टोचले, अपक्ष लढण्याच्या चर्चेवर म्हणाल्या, “घरातल्या कार्यालयात बसून…”
ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

हेही वाचा >>>पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील दोन विद्यार्थिनींनी रॅगिंगची तक्रार महाविद्यालय प्रशासनाकडे केली. या दोन्ही विद्यार्थिनींनी वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. पहिल्या विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर रॅगिंग प्रतिबंधक समितीने चौकशी केली. त्यात तक्रारदार विद्यार्थिनी, तिच्या वर्गातील विद्यार्थी, दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांची चौकशी करण्यात आली. यानंतर हा चौकशी अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे पाठविण्यात आला. यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. दुसऱ्या विद्यार्थिनीच्या तक्रारीवरही सध्या चौकशी सुरू आहे.

हेही वाचा >>>पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित

रॅगिंगची पहिली घटना

रॅगिंगची पहिली घटना गेल्या महिन्यात घडली आहे. याप्रकरणी क्ष-किरणशास्त्र विभागात वैद्यकीय पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने तक्रार दिली आहे. ही विद्यार्थिनी सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी असून, ती आता पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. तिने तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी रॅगिंग प्रतिबंधक समितीने चौकशी केली होती. समितीने चौकशी करून आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे सादर केला आहे.

रॅगिंगची दुसरी घटना

रॅगिंगची दुसरी घटना गेल्या आठवड्यात घडली. याप्रकरणी भूलशास्त्र विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने तक्रार दिली आहे. या प्रकरणी रॅगिंग प्रतिबंधक समितीने चौकशी केली आहे. आता पदव्युत्तर तक्रार समितीकडून पुढील चौकशी सुरू आहे.

रॅगिंगबाबत पदव्युत्तरच्या एका विद्यार्थिनीने गेल्या महिन्यात तक्रार केली होती. याप्रकरणी चौकशी करून अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे पाठविला आहे. दुसऱ्या विद्यार्थिनीची तक्रार गेल्या आठवड्यात मिळाली असून, तो विभागांतर्गत वाद आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे.- डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय