पुणे : साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला मालमत्ता खरेदी-विक्रीची दस्तनोंदणी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. त्यामुळे शनिवारी (२२ एप्रिल) शासकीय सुटी असूनही दस्तनोंदणी कार्यालये सुरू ठेवण्याचा आदेश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी दिला.

नागरिकांच्या मागणीनुसार सह दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्याची नागरिकांमध्ये भावना असते. त्यानुसार नागरिकांना जमीन, सदनिका आदी खरेदी-विक्री करता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काही ठरावीक सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, शहरात पाच सह दुय्यम निबंधक कार्यालये राहणार सुरू राहणार आहेत.

Assistant Police Inspector promoted soon
आनंदाची बातमी! सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती
Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…

हेही वाचा – जगभरातील अतिश्रीमंतांचा सोन्याकडे ओढा

शनिवारी (२२ एप्रिल) आणि रविवारी (२३ एप्रिल) सिद्धी टॉवर, दापोडी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र. १७ आणि युगाई मंगल सभागृह, एरंडवणे येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. २२ ही कार्यालये दुपारी एक ते रात्री पाऊणेनऊ वाजेपर्यंत, युगाई मंगल सभागृह एरंडवणे येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. २१ आणि सिद्धी टॉवर दापोडी येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. २५ ही कार्यालये सकाळी ७.३० ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय इमारत येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. २३ कार्यालय सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत सुरू राहणार असल्याचेही नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.