वाघांप्रमाणेच हत्तीदेखील संकटात आले असून, सरकारने ‘हत्ती वाचवा’ ही मोहीम हाती घेण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार राजेश बेदी यांनी शनिवारी व्यक्त केले. यापूर्वी सरकारने सुरू केलेला ‘प्रोजेक्ट एलिफंट’ हा शीतपेटीमध्येच पडला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी राजेश बेदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वाघांची संख्या कमी झाल्याची देशभरामध्ये चर्चा होते. या विषयावर राजकारणदेखील केले जाते. वाघांच्या संख्येमध्ये वाढ झाली पाहिजे याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. पण, वाघांप्रमाणेच देशातील हत्तींची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे हत्ती वाचविण्यासाठी मोहीम हाती घेण्याची गरज आहे. यापूर्वी सरकारने ‘प्रोजेक्ट एलिफंट’ हा प्रकल्प हाती घेतला होता. मात्र, हा प्रकल्प शीतपेटीमध्येच पडून असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. देशामध्ये माळढोक पक्षी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच उरले आहेत याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, वाघ कमी होत आहेत म्हणून त्यावरच लक्ष केंद्रित करणे हे अन्य प्रजातींसाठी धोक्याचे ठरू शकते.
आपण पर्यावरणाचा भाग आहोत असा वन्यजीवांना आपल्याविषयीचा विश्वास वाटला पाहिजे. तरच, वन्यजीवांचे छायाचित्र टिपणे हे कष्टपद काम सुलभपणे होऊ शकते. हत्तींविषयी छायाचित्रांसह माहिती देणारे पुस्तक लिहिले असून ते जिम कॉर्बेट यांना समर्पित केले असल्याचे त्यांनी सांगितले. युवा पिढीतील छायाचित्रकार मेहनत घेताना दिसत नाहीत. फोटोशॉपमध्ये कारागिरी करणे हे छायाचित्रण कला आणि स्वत:शीच प्रतारणा करण्यासारखे आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘अणुऊर्जा नको, वीज वाचवा’
पर्यावरणाचे संतुलन बिघडवणाऱ्या अणुऊर्जेद्वारे विजेची निर्मिती करण्यापेक्षा वहन आणि वितरणामध्ये होणारे नुकसान थोपवून वीज वाचविणे महत्त्वाचे आहे, असे मत चेन्नई येथील पर्यावरणवादी पत्रकार नित्यानंद जयरामन यांनी व्यक्त केले. अणुऊर्जा ही महागडी असून त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे. देशामध्ये सव्वादोन लाख मेगाव्ॉट विजेची निर्मिती होते. त्यापैकी ६४ हजार मेगाव्ॉट वीज वहन आणि वितरणामध्ये नष्ट होते, असेही ते म्हणाले.

how did Ujjwal Nikam enter politics
प्रमोद महाजन हत्या ते २६/११ चा खटला, उज्ज्वल निकम राजकारणात कसे आले?
mira road, Woman Raped, Forced to Convert to Islam, case register against Six Accused, with obscene pictures money extorted, naya nagar police, mira road news, crime news, police,
तरूणीवर बलात्कार, केस कापून केले विद्रुप; मुस्लीम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा आरोप
narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!