Premium

प्रवाशांना खुशखबर! प्रयागधाम उत्सवासाठी उरळी कांचन रेल्वे स्थानकावर अनेक गाड्यांना थांबा

प्रयागधाम येथील वार्षिक मकर संक्रांती उत्सवासाठी उरुळी कांचन स्थानकावर काही गाड्यांना तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

Several trains stop at Urli Kanchan railway station for Prayagdham festival
मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यादव यांनी पुणे विभागातील दौंड मार्गाची पाहणी केली.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : प्रयागधाम येथील वार्षिक मकर संक्रांती उत्सवासाठी उरुळी कांचन स्थानकावर काही गाड्यांना तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. भाविकांच्या सोयीसाठी गाड्यांना २७ डिसेंबर ते पुढील वर्षी १७ जानेवारी या कालावधीत एक मिनिटाचा तात्पुरता थांबा देण्यात येणार आहे.

थांबा दिलेल्या गाड्यांमध्ये वास्को – हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन – वास्को गोवा एक्स्प्रेस, म्हैसूर – हजरत निजामुद्दीन स्वर्ण जयंती एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन – म्हैसूर स्वर्ण जयंती एक्स्प्रेस, यशवंतपूर – चंडीगड संपर्क क्रांती एक्स्प्रेस, चंडीगड- यशवंतपूर संपर्क क्रांती एक्स्प्रेस, यशवंतपूर – हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन – यशवंतपूर संपर्क क्रांती एक्स्प्रेस, कोल्हापूर – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन – कोल्हापूर एक्स्प्रेस, पुणे – गोरखपूर एक्स्प्रेस, पुणे – लखनौ एक्स्प्रेस, लखनौ – पुणे एक्स्प्रेस, दौंड- इंदूर एक्स्प्रेस, इंदूर – दौंड एक्स्प्रेस, हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे – हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस या गाड्यांना उरळी कांचन स्थानकावर तात्पुरता थांबा असेल. याचबरोबर पुणे-जम्मू तावी झेलम एक्स्प्रेसमधील सामान्य वर्गाचा एक डबा १५, १६ आणि १७ जानेवारीला उरुळी स्थानकावर प्रवाशांकरीता उघडण्यात येईल.

आणखी वाचा-पादचारी दिनानिमित्त पीएमपीच्या आज जादा गाड्या; दर तीस मिनिटांला गाडी, पीएमपीच्या संचलनात बदल

सरव्यवस्थापकांकडून दौंड मार्गाची पाहणी

मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यादव यांनी पुणे विभागातील दौंड मार्गाची पाहणी केली. त्यांनी लोहमार्ग, सिग्नल आणि ओव्हरहेड इक्विपमेंट यासह विविध सुरक्षा उरपाययोजनांचा आढावा घेतला. या वेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Several trains stop at urli kanchan railway station for prayagdham festival pune print news stj 05 mrj

First published on: 10-12-2023 at 22:01 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा