सीड इन्फोटेक कंपनीशी सामंजस्य करार

नव्याने व्यवसायास सुरुवात केलेल्या उद्योगांच्या म्हणजेच स्टार्टअप्सच्या व्यवसायाला गती देऊन त्यांचे रुपांतर मोठय़ा यशस्वी उद्योगात करण्यासाठी सिंगापूरमधील गोविन कॅपिटल ही संस्था पुण्यातील व्यवसायांना मदत करणार आहे. त्यासाठी या संस्थेची उपकंपनी असलेल्या गोविन अ‍ॅकॅडमीने पुण्यातील ‘सीड इन्फोटेक’ या देशातील सर्वात मोठय़ा आयटी ट्रेिनग आणि स्टािफग कंपनीशी नुकताच सामंजस्य करार केला.

गोविन कॅपिटल ही संस्था स्टार्टअप अ‍ॅक्सेलेटर इंडिया या त्यांच्या उपक्रमांतर्गत भारतात विशाखापट्टणम आणि आयआयटी मद्रास इनक्युबेशन सेलमध्ये काम करत असून या संस्थेने आतापर्यंत अनेक स्टार्टअप्सना निधी पुरविला आहे. गोविन कॅपिटलने पलाश आयव्हीएफ सोल्युशन्स प्रा. लि. आणि सेलेबिन्स हेल्थकेअर या पुण्यातील दोन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. पलाश आयव्हीएफकडून आयव्हीएफ केंद्रांना आयटी सोल्युशन्स पुरविली जातात आणि ही केंद्रे देशात आणि परदेशात यशस्वीरीत्या काम करत आहेत. सेलेबिन्स हेल्थकेअरतर्फे आरोग्यनिगा क्षेत्रातील रेडिओलॉजी विभागासाठी अत्याधुनिक सोल्युशन्स पुरविली जातात. या दोन्ही कंपन्या पलाश समूहातील कंपन्या आहेत.

गोविन कॅपिटलची उपकंपनी असलेल्या गोविन अ‍ॅकॅडमीने दोन्ही कंपन्यांबरोबर आवश्यक सामंजस्य करार केला असून त्यावर शुक्रवारी दोन्ही संस्थांच्या वतीने स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या संदर्भातील औपचारिक घोषणा गोविन अ‍ॅकॅडमीचे संस्थापक आनंद गोिवदलुरी आणि सीड इन्फोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नरेंद्र बऱ्हाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

सीड इन्फोटेकबरोबर झालेल्या सामंजस्य करारासंदर्भात गोिवदलुरी म्हणाले, की या सामंजस्य करारानुसार, गोविन अ‍ॅकॅडमी सीड इन्फोटेकसाठी कॉलेज पार्टनर म्हणून काम करणार आहे. या प्रसंगी बोलताना बऱ्हाटे म्हणाले, की आम्ही दोघे मिळून इंटरनॅशनल सेंटर फॉर आंत्रप्रन्युअरशिप (आयसीए) स्थापन करणार आहोत. त्याद्वारे पुण्यातील आंत्रप्रन्युरिअल एज्युकेशनमधील सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्टार्टअप्सना मार्गदर्शन करण्याबरोबरच अशा नव्या उद्योगांत गुंतवणूक करणाऱ्यांना योग्य स्टार्टअप्सपर्यंत पोचविण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.