लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. बहुतांश पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. मेथी, शेपू, अंबाडी, राजगिरा, चुका, चवळई, हरभरा गड्डीच्या दरात वाढ झाली आहे. कोथिंबिर, चाकवत, मुळा, पालकाचे दर स्थिर आहेत. भेंडी, गवार, फ्लॉवर, कोबी, वांगी, ढोबळी मिरचीच्या दरात वाढ झाली. लसणाच्या दरात घट झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
chhagan bhujbal, armstrong company
भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला जिल्हा बँकेकडून २६ कोटींचा लाभ, थकीत कर्जफेडीसाठी ‘ओटीएस’ योजनेत सहभाग
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार

आणखी वाचा-वैमनस्यातून तरुणावर हल्ला; गुंड नयन मोहोळसह साथीदारांवर गुन्हा

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरेच्या दीड लाख जुडी आणि मेथीच्या ७० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दरांमध्ये कोथिंबीर १००० ते १५०० रुपये, मेथी ६०० ते १००० रुपये, शेपू ८०० ते १००० रुपये, कांदापात ८०० ते १२०० रुपये, चाकवत ४०० ते ७०० रुपये, करडई ३०० ते ७०० रुपये, पुदिना- ३०० ते ८०० रुपये, अंबाडी ४०० ते ७०० रुपये, मुळा ६०० ते १००० रुपये, राजगिरा ४०० ते ७०० रुपये, चुका ६०० ते १००० रुपये, चवळई ३०० ते ७०० रुपये, पालक ८०० ते १५०० रुपये, हरभरा गड्डी ८०० ते १५०० रुपये असे दर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.