श्वान प्रशिक्षण अभ्यासक्रम परीक्षेत देशात प्रथम

पुणे : पोलीस दलासाठी काम करणाऱ्या श्वानांचा सांभाळ करणे हे कठीण काम मानले जाते. त्यांचा सांभाळ अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. पोलीस श्वानांना दिले जाणारे प्रशिक्षणही अन्य श्वानांपेक्षा खडतर असते. सक्ती किंवा ताकीद फक्त शब्दातून द्यावी लागते. मारहाण तर अजिबातच चालत नाही, अशा परिस्थितीतही श्वान प्रशिक्षण अभ्यासक्रम परीक्षेत देशात प्रथम येण्याचा मान राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) श्वान प्रशिक्षक सुप्रिया किंद्रे-धुमाळ यांनी मिळवला आहे. राज्यातील पहिली महिला श्वान प्रशिक्षक होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे.

सुप्रिया यांनी मध्यप्रदेशातील टेकनपूर येथील नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग (एनडीसीडी) या संस्थेतून श्वान प्रशिक्षक अभ्यासक्रम पूर्ण केला. देशभरातील विविध राज्यातील पोलीस  तसेच निमलष्करी दलातील  श्वान प्रशिक्षक या अभ्यासक्रमात सहभागी झाले होते. या अभ्यासक्रमासाठी निवडल्या गेलेल्या सुप्रिया एकमेव महिला होत्या. महाराष्ट्र पोलीस दलातून त्यांना श्वान प्रशिक्षक अभ्यासक्रमास पाठविण्यात आले होते. या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत महिलेची निवड झाली नव्हती.

up pharmacy college latest news
पेपरमध्ये लिहिलं ‘जय श्रीराम, पास होऊ देत’, विद्यार्थी ५६ टक्क्यांनी उत्तीर्ण! दोन प्राध्यापकांची झाली गच्छंती
lokmanas
लोकमानस: सहकाराखालोखाल राजकारणाचा अड्डा
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
Centers for training of medical teachers are insufficient in the state
राज्यात वैद्यकीय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी केंद्र अपुरे; वैद्यकीय शिक्षक संघटना म्हणते…

श्वान हाताळणी (हँडलर) ते प्रशिक्षकपदापर्यंतचा प्रवास उलगडताना त्या म्हणाल्या, ‘श्वानांना पुरुषांकडून प्रशिक्षण दिले जाते. देशपातळीवर पोलीस किंवा निमलष्करी दलातील श्वान केंद्रात (डॉग युनिट) महिला प्रशिक्षक नाहीत.  महिला श्वान हँडलर आहेत. पण प्रशिक्षकपदापर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. देशभरात पोलीस श्वान प्रशिक्षण विषयक तीन संस्था आहेत. मध्यप्रदेशातील टेकनपूर, राजस्थानातील अलवार आणि चंदीगडमध्ये या संस्था आहेत. श्वानांना वेगवेगळ्या पातळीवर प्रशिक्षण दिले जाते. अमली पदार्थाचा माग काढणाऱ्या श्वानांना ‘नाकरे’ म्हटले जाते. गुन्हेगारांचा माग काढणारे तसेच स्फोटके हुडकून काढणाऱ्या श्वानांना वेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. गस्त (पेट्रोलिंग) तसेच बंदोबस्तासाठी (गार्ड) वेगळे प्रशिक्षण असते. भूसुरुंग शोधून काढण्याचेही प्रशिक्षण श्वानांना दिले जाते.’

पोलीस श्वानांचे प्रशिक्षण अवघड

पोलीस दलातील श्वानांना हाताळणाऱ्या महिलांची संख्या अत्यल्प आहे. महाराष्ट्रातील श्वानांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील श्वान प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण दिले जाते. हे केंद्र पुण्यात आहे. प्रशिक्षकांना श्वानांचा सांभाळ करण्याची आवड असणेही महत्त्वाचेआहे. माझ्या वडिलांनी मला श्वानांना लळा लावला. अगदी लहान वयापासून मी श्वानांचा सांभाळ करायचे. पुणे जिल्ह्य़ातील भोर तालुक्यातील बोगवली हे माझे गाव आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला मार्गदर्शन केल्याने मी श्वान प्रशिक्षक अभ्यासक्रमात यश मिळवू शकले. –  सुप्रिया किंद्रे

सुप्रिया किंद्रे यांनी श्वान प्रशिक्षण अभ्यासक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केला. करोनाच्या संसर्गात टेकनपूर येथील श्वान प्रशिक्षण संस्थेतून त्यांनी निवासी अभ्यासक्रम पूर्ण केला. अशा प्रकारचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला श्वान प्रशिक्षक ठरल्या आहेत.

– अतुलचंद्र कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस महासंचालक, सीआयडी