पक्षी निरीक्षण करणाऱ्या पक्षीप्रेमींना अडथळा होत असल्याचे आणि सुरक्षेचे कारण पुढे करून महापालिकेच्या उद्यान विभागाने अविवाहित जोडप्यांना पाषाण तलाव परिसरात बंदी घालण्याचा फतवा काढला आहे.

पुणे महापालिका आणि परिसरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी संस्थांकडून पाषाण तलावाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. तलावात मैलापाणी येऊ नये, जलपर्णी वाढू नये, परिसरातील जैवविविधता कायम राहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाषाण तलावाच्या परिसरात वृक्षांची संख्या मोठी असल्याने तेथे विविध जातीच्या पक्षांचे वास्तव्य आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षणाची आवड असणारे पक्षीप्रेमी पाषाण तलावाच्या परिसरात येतात. या ठिकाणी प्रेमी युगुलेही फिरण्यासाठी येतात. मात्र, त्यांच्यामुळे पक्षी निरीक्षणामध्ये अडथळे येत असल्याच्या तक्रारी आहेत.

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
Leopard Vasai Fort
वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन, वनविभागाची कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु

वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका कधी?; रखडलेले उड्डाणपूल, नागरिक हैराण

याबाबत पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पक्षीप्रेमींनी पालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या उद्यान विभागाने हा निर्णय घेतला आहे. पक्षी निरीक्षण करणाऱ्या नागरिकांना अडथळा होत असल्याने पाषाण तलावाच्या परिसरात अविवाहित जोडप्यांना फिरण्या-बसण्यावर बंदी घातली असून सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

वादाची शक्यता –

पाषाण तलाव परिसरात येणारे विवाहित जोडपे, अविवाहित जोडपे कोणते, प्रेमी युगुल, भाऊ-बहिण यातील फरक महापालिकेचे सुरक्षारक्षक व कर्मचारी कसे ओळखणार? असा प्रश्न असून यावरून वाद होण्याची शक्यता आहे.

शहरातील इतर सर्व उद्याने जोडप्यांसाठी खुली –

“पाषाण तलावात आतापर्यंत दोन मृतदेह आढळून आले आहेत. तेथे प्रेमी युगुल किंवा अविवाहित जोडप्यांमुळे वादविवाद होऊ शकतात. महापालिकेची या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही. पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांनाही अडथळा होत असल्याने अविवाहित जोडप्यांना पाषाण तलावाच्या परिसरात बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील इतर सर्व उद्याने जोडप्यांसाठी खुली आहेत.”, असे उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले.