पुणे: उन्हाळ्यात तापमानाच्या पाऱ्यात वाढ होत असल्याने रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटनांचा धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार देशभरातील रुग्णालयांची तपासणी मोहीम तातडीने हाती घेतली जाणार आहे.

राज्यांचे आरोग्य विभाग आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात ही मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात रुग्णालयांची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. रुग्णालयांचे सर्वसमावेशक अग्निसुरक्षा ऑडिट, प्रत्यक्ष तपासणी करण्याचा यात समावेश आहे. त्यात फायर अलार्म, फायर स्मोक डिटेक्टर, अग्निशामक यंत्रे, फायर हायड्रंट्स आणि फायर लिफ्ट्ससह अग्निरोधक यंत्रणा यांची तपासणी केली जाईल.

3 75 lakh applications received for 1800 jail constable posts in maharashtra
कारागृह रक्षकांच्या १८०० जागांसाठी पावणेचार लाख अर्ज
Transport changes for heavy vehicles due to Narendra Modis campaign
ठाणे : नरेंद्र मोदी यांच्या प्रचारामुळे जड अवजड वाहनांसाठी वाहतुक बदल
dps ponds, Report on DPS ponds, Union Ministry of Environment Forests Climate Change marathi news
डीपीएस तलावप्रकरणी अहवाल द्या; केंद्रीय पर्यावरण, वने, हवामान बदल मंत्रालयाचे राज्य सरकारला निर्देश
Raju Kendre,
राजू केंद्रे यांची जर्मन सरकारच्या प्रतिष्ठित जर्मन चॅन्सलर फेलोशिपसाठी निवड
ED , investigation, Tadoba,
ईडीने सुरू केला ताडोबा प्रकल्पातील १२ कोटींच्या घोटाळ्याचा तपास
loksatta district index measuring progress of maharashtra districts
उद्योग, रोजगाराच्या प्रश्नांमुळे पीछेहाट; उपराजधानीत साधनसंपत्ती असूनही विकास संथगतीने
Maharera Warns Developers Use Certified Brokers for House Transactions or Face Strict Action
प्रशिक्षित, प्रमाणपत्रधारक दलालांमार्फतच घर विक्री – खरेदी करा, अन्यथा प्रकल्पांविरोधात कडक कारवाई; महारेराचा विकासकांना इशारा
Lilavati Hospital, Lilavati Hospital Trustee Exposes scam, Rs 500 Crore Scam, Lilavati Hospital scam, Lilavati Hospital 500 Crore Scam, Funds Diverted to Fake Companies, Personal Legal Fees,
लीलावती रुग्णालयामध्ये ५०० कोटींचा आर्थिक घोटाळा, नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाद्वारे घोटाळा उघडकीस

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

याचबरोबर विद्युत भार लेखा परीक्षण करण्यात येईल. अपुऱ्या विद्युतभार क्षमतेमुळे निर्माण होणार्‍या समस्यांचे निराकरण करणे, रुग्णालयांनी नियमितपणे, विशेषत: नवीन उपकरणे जोडताना अथवा अतिदक्षता विभागात उपकरणांची जागा बदलताना विद्युत भार लेखा परीक्षण करणे आवश्यक असते. त्यामुळे या बाबी तपासून त्रुटी तत्काळ दूर करण्यास रुग्णालयांना बजावण्यात येईल. रुग्णालयांनी अग्निशमन विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा – मावळमध्ये महायुतीतील तिढा वाढला

हेही वाचा – “त्यांच्याकडे पहिलवान असले, तर आमच्याकडे..”, रवींद्र धंगेकर यांचा मोहोळ यांना टोला; शरद पवारांची घेतली भेट

आगीची दुर्घटना टाळण्यासाठी…

  • अग्निशामक प्रणाली कार्यक्षम आहे काय याची काळजी घ्यावी.
  • सुरक्षा उपकरणांची नियमित देखभाल व दुरुस्ती करावी.
  • रुग्णालयाच्या वीज वापराचे मूल्यमापन करण्यासाठी, विशेषत: अतिदक्षता विभागात वर्षातून दोनदा विद्युत भार लेखा परीक्षण करणे.
  • ऑक्सिजन टाक्या अथवा ऑक्सिजन पाईप असलेल्या भागात, धूम्रपान प्रतिबंधक धोरणांची कठोर अंमलबजावणी करणे आणि उष्णतेच्या स्रोतांवर नियंत्रण ठेवणे.
  • संपूर्ण रुग्णालयात, विशेषत: रुग्णांच्या खोल्या, मधली जागा आणि सार्वजनिक भागात फायर स्मोक डिटेक्टर आणि फायर अलार्म बसविणे.
  • रुग्णांची काळजी घेण्याच्या विभागातील ज्वलनशील वस्तू काढून त्या जागी पेट न घेणाऱ्या वस्तू ठेवणे.
  • महत्वाच्या विभागांमध्ये सहज उपलब्ध होईल अशी स्वयंचलित पाणी फवारणी प्रणाली बसवणे.
  • नॅशनल बिल्डिंग कोड २०१६ मध्ये नमूद केलेल्या नवीन अग्निसुरक्षा मानकांचे पालन करणे.