नणंदेच्या नवऱ्याने विनयभंग केल्याने विवाहित महिलेची आत्महत्या 

अर्चना यांचे २० डिसेंबर २०१५ रोजी विनोद ढवारे याच्याशी लग्न झाले होते.

Crime, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
सांगली येथे एका पोलीस उपअधीक्षकाने राहत्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली.

कोथरुड येथील डाहणूकर कॉलनीत नणंदेच्या नव-याने लगट करण्याच्या बहाण्याने जवळीक साधून विनयभंग केल्याने एकोणीस वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे. अर्चना उर्फ काजल विनोद ढावरे (वय-१९, रा.लक्ष्मीनगर वसाहत, डहाणुकर कॉलनी, कोथरुड, पुणे), असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती विनोद ढावरे, सासू सरस्वती ढवारे आणि नंदेचा नवरा हनुमंत सोनवणे यांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मयत अर्चना यांचे २० डिसेंबर २०१५ रोजी विनोद ढवारे याच्याशी लग्न झाले होते. तेव्हापासून त्यांचा शारिरीक आणि मानसिक छळ केला जात होता. तसेच त्यांना माहेरी न पाठवता हीन दर्जाची वागणूक देऊन तिचा छळ केला जात होता. अर्चना हिच्या नंदेचा नवरा हनुमंत सोनवणे याने तिच्याशी जवळीक साधण्याच्या बहाण्याने लगट केली. शेवटी या सर्व प्रकारास कंटाळून तिने २३ जानेवारी रोजी राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आली असून अधिक तपास करण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Women doing suicide after molestation in pune

ताज्या बातम्या