scorecardresearch

Premium

फक्त दहा मिनिटांमध्ये असे बनवा पौष्टिक गव्हाच्या पीठाचे धिरडे, लगेच रेसिपी नोट करा

गव्हाच्या पीठाचे धिरडे अत्यंत पौष्टिक आणि चवीला स्वादिष्ट असते. हे धिरडे नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय आहे. याशिवाय लहान मुलांना सुद्धा तुम्ही डब्यावर हे धिरडे देऊ शकता. फक्त दहा मिनिटांमध्ये होणारी ही सोपी रेसिपी आज आपण जाणून घेऊ या.

Gavhachya Pithache Dhirde recipe
फक्त दहा मिनिटांमध्ये असे बनवा पौष्टिक गव्हाच्या पीठाचे धिरडे, लगेच रेसिपी नोट करा (Photo : YouTube)

Gavhachya Pithache Dhirde : तुम्ही अनेकदा बेसनाचे धिरडे खाल्ले असेल पण तुम्ही कधी गव्हाच्या पीठापासून बनवता येणारे धिरडे खाल्ले आहे का? गव्हाच्या पीठाचे धिरडे अत्यंत पौष्टिक आणि चवीला स्वादिष्ट असते. हे धिरडे नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय आहे. याशिवाय लहान मुलांना सुद्धा तुम्ही डब्यावर हे धिरडे देऊ शकता. फक्त दहा मिनिटांमध्ये होणारी ही सोपी रेसिपी आज आपण जाणून घेऊ या.

साहित्य

 • गव्हाचं पीठ
 • रवा
 • तेल
 • जिरे
 • मोहरी
 • हिंग
 • हिरवी मिरची
 • कांदा
 • टोमॅटो
 • गाजर
 • कोथिंबीर
 • पाणी

हेही वाचा : हीच खरी माणुसकी! चिमुकल्या मुलांनी वाचवला कुत्र्याचा जीव, व्हिडीओ होतोय व्हायरल

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
black seed oil benefits
फक्त दोन ते तीन आठवड्यांमध्ये कलौंजीचे तेल त्वचा, केस अन् आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते का?
Exercising 150 mins week to prevent heart attacks Study says it may not be enough if you have sugary health drinks
दर आठवड्याला व्यायाम करता? पण साखरयुक्त पेय घेऊन सर्व मेहनत वाया घालवता; संशोधनाबाबत काय सांगतात डॉक्टर….

कृती

 • एक वाटी गव्हाचं पीठ घाला आणि त्यात मोठे दोन चमचे रवा घाला
 • त्यात चवीनुसार मीठ घाला
 • थोडे थोडे पाणी घाला
 • पातळ मिश्रण तयार होईल
 • एका कढईत तेल गरम करा आणि त्यात जिरे आणि मोहरी घाला आणि त्यात हिंग घाला.
 • बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि गाजर त्यात घाला.
 • चांगले परतून घ्या आणि गॅस बंद करा
 • त्यानंतर गव्हाचे पीठ आणि रवापासून बनवलेल्या मिश्रणामध्ये हे परतून घेतेलेली फोडणी घाला.
 • त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात टाका
 • सर्व मिश्रण एकत्र करा.
 • नॉन स्टिक तवा घ्या
 • गरम तव्यावर थोडं तेल लावा
 • आणि त्यावर पातळ धिरडं घाला
 • मंद आचेवर धिरडं दोन्ही बाजूने भाजून घ्या
 • हे धिरडं तुम्ही आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gavhachya pithache dhirde recipe how to make gavhachya pithache dhirde food news marathi recipe healthy food ndj

First published on: 07-12-2023 at 15:45 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×