Viral Video : सोशल मीडियावर कुत्र्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात कुत्रा हा माणसाचा अतिशय जवळचा आणि प्रिय प्राणी आहे. कुत्र्याचे माणसाबरोबरच्या मैत्रीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चिमुकल्या मुलांनी माणूसकी दाखवत कुत्र्याचा जीव वाचवला आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका नाल्याजवळचा आहे. एक नाला ओसंडून वाहताना दिसत आहे . व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नाल्याच्या एका बाजूला कुत्रा फसलेला दिसत आहे. वाहत्या नाल्यामुळे तो रस्त्यावर येऊ शकत नाही.
अशावेळी या कुत्र्याच्या मदतीला दोन चिमुकले धावून येतात आणि कुत्र्याचा जीव वाचवतात. ते कुत्र्याला हातात धरुन नाल्याच्या दुसऱ्या बाजूला घेऊन येतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल की प्राणीमात्रांवर दया करणे आणि त्यांची मदत करणे, हीच खरी माणूसकी आहे.
हेही वाचा : Pune : पुण्यातील पडती इमारत पाहिली का? व्हिडीओ होतोय व्हायरल
harshasai404 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लहान गोष्टी खूप आनंद देऊन जातात” या व्हिडीओवर युजर्सनी प्रतिक्रिया देत या चिमुकल्यांवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “धन्यवाद मुलांनो, कुत्र्याला तुम्ही वाचविले.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान मुलांनो..” आणखी एका युजरने लिहिलेय, “धाडसी मुले..”