[content_full]

“लूकिंग हॉट हां!“ डब्यात कुडकुडत बसलेल्या अळीवाच्या लाडवाला रव्याच्या लाडवानं मुद्दामच चिडवलं. ही रव्याच्या लाडवाची लहानपणापासूनची खोड होती. कुणी स्वस्थ बसलेलं त्याला बघवायचं नाही. अळीवाच्या लाडवाला रागच आला, पण लगेच उसळून रव्याचे वाभाडे काढायला तो काय कुठल्या न्यूज चॅनेलचा प्राइम टाइमचा शो होस्ट करत नव्हता. त्यानं शांततेत घ्यायचं ठरवलं. आता बुंदीच्या लाडवालाही राहवेना. `काय बाबा, सध्या फारच डिमांड आहे तुम्हाला. अगदी हॉट केक सारखे खपताय तुम्ही. आम्हाला कोण विचारतंय?“ बुंदीच्या लाडवानं खोड काढली. आपण लाडवासारखे लाडू असताना आपल्याला `केक` म्हटल्याबद्दल अळीवाला पुन्हा राग आला. पण तरीही त्यानं मौनव्रत पाळलं. तसंही विरोधकांसमोर काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही, हे तो `मन की बात` ऐकून ऐकून शिकला होता. “काय रे, हिवाळ्यातच का ह्यांना एवढी डिमांड?“ अळीवाचा लाडू प्रतिसाद देत नाही, हे बघून रव्यानं बुंद्याकडे मोर्चा वळवला. “काय करणार बाबा, सध्या थंडी आहे ना! आणि थंडीत हे अळीव शरीरातली उष्णता वाढवायला मदत करतात म्हणे!“ बुंद्यानं खुलासा केला. रव्यानं अळीवाला `हॉट` म्हटलं असलं, तरी त्याचा खरा अर्थ त्याला तरी कुठे माहीत होता? अळीवाला आता ही बडबड असह्य झाली होती. शेजारच्या बरणीत स्थितप्रज्ञपणे बसलेल्या डिंकाच्या लाडवाकडे त्यानं भावपूर्ण कटाक्ष टाकला. डिंक्यानं त्यांचं सगळं बोलणं ऐकून घेतलं होतं. त्यानं हातानेच अळीवाला शांत राहण्याची खूण केली. “तू कशाला काळजी करतोयंस? बाळंतिणींशिवाय दुसरीकडे कुठे डिमांड नसते ह्या दोघांना!“ बुंद्या रव्याच्या कानात खुसपुसला आणि दोघांनी एकमेकांना टाळ्या दिल्या. एवढ्यात एकच गोंगाट झाला आणि एका काकांनी त्यांच्याबरोबर आलेल्या मुलांना डिंकाचे आणि अळीवाचे सगळे लाडू वाटून टाकले. रव्यानं आणि बुंद्यानं कपाळावर हात मारून घेतला. `आय हेट हिवाळा!` रव्याचे पुढचे शब्द हवेत विरून गेले.

The Union Public Service Commission CAPF registration begins apply for 506 Assistant Commandant posts
UPSC Recruitment 2024: यूपीएससी अंतर्गत ‘या’ ५०६ पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी उरलेत काही दिवस
Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
How To Save Electricity Bill Through Cooler
उन्हाळ्यात कुलरमुळे येणारं वीज बिल कमी करण्यासाठी कमाल जुगाड; प्लास्टिकच्या बाटलीचा ‘असा’ वापर करुन पाहा अन् पैसे वाचवा

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • १ वाटी अळीव
  • २ नारळ
  • अर्धा किलो गूळ
  • १० बदाम बारीक़ चिरलेले
    किंवा जाडसर पूड करून
  • काजू आवडीनुसार बारीक
    किंवा जाडसर पूड करून
  • २ मोठे चमचे मनुके
  • १/२ छोटा चमचा वेलची पूड

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • नारळाच्या पाण्यात किंवा 1 वाटी दुधात अळीव २ तास भिजत ठेवणे.
  • अळीव भिजल्यावर अळीव, ओले खोबरे व गूळ एकत्र करून मंद आचेवर शिजायला ठेवावे. नीट मिसळले की काजू पूड, बदाम पूड व वेलची पावडर घालून ढवळावे.
  • पाण्याचा अंश आटून खुटखुटीत होईपर्यंत शिजवावे.
  • गोळा झाला की मिश्रण गॅस बंद करावा. मिश्रण थंड होऊ दयावे.
  • थंड झाल्यावर हव्या त्या आकारात लाडू वळावेत.

[/one_third]

[/row]