शाळकरी विद्यार्थ्यंची उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली आहे. अनेक जण यादरम्यान गावी जातात. गावी जाताना बहुदा ट्रेन, बस किंवा ट्रॅव्हलने प्रवास केला जातो. तर बसने प्रवास करताना जेवणासाठी काही ठराविक हॉटेलसमोर बस थांबवली जाते. पण, ट्रेनमधून जाताना हा पर्याय नसतो. तर अशावेळी प्रवासातून खायला काय घेऊन जायचं असा प्रश्न पडतो. तर आज आम्ही तुम्हाला एक खास रेसिपी सांगणार आहोत ; जी तुम्ही प्रवासादरम्यान डब्यातून घेऊ जाऊ शकता. तर या रेसीपीचे नाव आहे ‘मोकळा झुणका’. चला तर पाहुयात या पदार्थाची सोपी रेसिपी.

साहित्य –

बेसनाचे पीठ, राई, जिरे, कडीपत्ता, हिंग, मसाला, हळद, मीठ, तेल, पाणी.

हेही वाचा…नाश्त्याला स्पेशल काय करायचं? झटपट होणारा ‘ब्रेड पोहा’ बनवून पाहा; रेसिपी लगेच नोट करा

कृती –

एक कढई घ्या. त्यात चार चमचे तेल घ्या. नंतर राई, जिरं, कडीपत्ता, हिंग, मसाला, हळद, मीठ हे घाला. हे सर्व टाकून झाल्यावर एक छोटा कप पाणी त्यात घाला. त्यानंतर त्यात बेसनाचे पीठ टाका. या पिठाचा एक गोळा होईपर्यंत पीठ टाकत रहा. गोळा तयार झाला की, त्याच्या बाजूने थोडंसं तेल घालायचं आणि दोन ते तीन मिनिटे झाकून ठेवायचं. नंतर गॅस बंद करा व गार झाल्यानंतर गोळा हाताने फोडा आणि मग पोळी किंवा भाकरी बरोबर खा. तुम्ही प्रवासादरम्यान मोकळा झुणका डब्यातून घेऊन जाऊ शकता.