Batata Matar Bhaji : कोणतीही भाजी करायची तर सर्वात महत्त्वाचे साहित्य म्हणजे तेल. तेलाशिवाय तुम्ही भाजी बनवू शकत नाही पण आम्ही तुम्हाला तेलाशिवाय स्वादिष्ट भाजी बनवू शकता, असे सांगितले तर.. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरंय. तुम्ही कधी एकही थेंब तेल न वापरता भाजी बनवू शकता. तुम्ही एकही थेंब तेल न वापरता कोणती भाजी खाल्ली आहे का? जर नाही तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे कारण आज आपण एकही थेंब तेल न वापरता बटाट्याची भाजी कशी बनवायची , हे जाणून घेणार आहोत.
साहित्य :
जिरे
बारीक चिरलेला कांदा
हळद
मीठ
गरम मसाला
लाल तिखट
इतर मसाले
बारीक चिरलेले टोमॅटो
उकळलेले बटाट्याचे काप
हिरवे मटार
बारीक चिरलेली कोथिंबीर
हेही वाचा : उरलेल्या भाताचा करा सुके बोंबील घालून मऊ मोकळा भात; १ खास युक्ती-आवडीने खातील सगळे
पाहा व्हिडीओ :
हेही वाचा : झणझणीत, कोल्हापुरी स्टाईल ‘कटाची आमटी’; पुरणपोळीला देईल अधिक स्वाद, पाहा सोपी रेसिपी…
कृती :
एक कढई घ्या.
ती गॅसवर कमी आचेवर ठेवा.
सुरुवातीला आपण तेल टाकतो पण येथे तेलाचा वापर करायचा नाही त्यामुळे सुरुवातीला जिरे टाका.
त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका.
त्यानंतर कांद्याला चांगले परतून घ्या.
त्यात दोन तीन थेंब पाणी घाला. (आवश्यकता भासल्यास)
त्यानंतर यावर हळद, मीठ, गरम मसाला, लाल तिखट आणि तुमचे नियमित मसाले टाका.
त्यानंतर त्यात पाणी टाका आणि चांगले परतून घ्या.
थोड्या वेळानंतर त्यात टोमॅटो टाका
त्यानंतर एक पेस्ट तयार होईल.
त्यानंतर तुम्ही त्यात हिरवे मटार टाका आणि उकळलेले बटाट्याचे काप टाका.
बटाटे एकजीव होऊ द्या.
शेवटी कोथिंबीर घाला.
एक ही थेंब तेल न वापरता तुम्ही अशा प्रकारे बटाट्याची भाजी बनवू शकता.
वरील व्हिडीओत तुम्हाला ही भाजी कशी बनवायची, याविषयी सांगितले आहे. dishcovery04 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तुम्ही व्हिडीओ पाहून या रेसिपी विषयी जाणून घेऊन शकता. या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अनेक हटके रेसिपी विषयी माहिती सांगितली आहे.