उन्हाळ्यात कैरी बाजारात सहज उपलब्ध होते. लोक सहसा या काळात भरपूर कैरी खरेदी करू त्याचे लोणचे करतात किंवा कैरीचे पन्हे करतात. पण या व्यतिरिक्तही अनेक पदार्थ कैरीपासून बनवतात येतात. याआधी आम्ही तुम्हाला कैरीचा आंबड गोड छुंदा कसा करायचा हे सांगितले. आज आम्ही तुम्हाला चटकदार कैरीची डाळ कशी बनवावी हे सांगणार आहोत. महाराष्ट्रात बहूतेक घरांमध्ये कैरीची डाळ बनवली जाते पण तुम्हाला हा पदार्थ कसा तयार होतो माहित नसेल तर काळजी करू नका ही घ्या सोपी रेसिपी. ही चटकदार कैरीची डाळ तुम्हाला नक्की आवडेल. कैरीच्या डाळीला आंबे डाळ असेही म्हणतात.

कैरीची डाळ किंवा आंबे कैरी रेसिपी

साहित्य
कैरी – १
हरभरा डाळ – १ वाटी
हिरव्या मिरच्या – २-३
मीठ – चवीप्रमाणे
साखर – एक चमचा
आले – अर्धा इंच
तेल – फोडणीपूर्ण
हिंग – एक चमचा
जिरे – एक चमचा
मोहरी -एक चमचा
हळद – एक चमचा
कढीपत्ता – एक चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर

Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
gold and silver Pani Puri
सोने-चांदीची पाणी पुरी! मोदींच्या गुजरातमधील या पाणी पुरीची एकच चर्चा; व्हायरल VIDEO एकदा पाहाच
vada pav recipe
वडापाव नव्हे! इडली वडापाव; कधी खाल्ला का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी
Nutritious but tasty Makhana Uttapam Try this recipe once
पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी

हेही वाचा – वर्षभर टिकणारा आंबट- गोड-तिखट कैरीचा छुंदा! एकदा खाल तर खातच राहाल, ही घ्या रेसिपी

कृती
हरभरा डाळ ५ तास पाण्यात भिजवा. कैरीची साल काढून किसून घ्यावी. भिजवलेली डाळ मिक्सरमध्ये मिरची टाकून अर्धवट वाटून घ्या.
त्यानंतर त्यात किसलेली कैरी टाका. त्यानंतर त्यात मीठ आणि कोथिंबीर टाका. त्यानंतर एका भांड्यात तेल गरम करून त्यात हिंग, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता टाकून फोडणी कैरीच्या डाळीवर टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या डाळ कैरी किंवा आंबे हळद तयार आहे.

डाळ कैरी तुम्ही नुसती खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावू शकता. तुम्ही ही रेसिपी कधी खाल्ली नसेल तर एकदा नक्की खाऊन पाहा.