उन्हाळा जवळ आला आहे. बाजारात हिरव्यागार आंबड-गोड कैरी तुम्हाला दिसत असतील. तुम्हाला नेहमी कैरीचे लोणचे किंवा कैरीचे पन्हे हे पदार्थ माहित असतील. पण तुम्ही कधी कैरीचा छुंदा खाल्लाय का? जर नसेल तर ही रेसिरी नक्की ट्राय करा. आंबट- गोड-तिखट असा कैरीचा छुंदा तुम्हाला नक्की आवडेल. उन्हाळ्यामध्ये तयार केलेला कैरीचा छुंदा वर्षभर टिकून राहातो. लहान मुलांना डब्याला काय द्यावे कळत नाही, अनेकदा मुलं केलली भाजी खात नाही अशा वेळी तुम्ही पोळीसह छुंदा देऊ शकता त्यांना नक्की आवडेल. आजारपणात तोंडाला चव नसेल तर डाळाभात, खिचडी भात किंवा फोडणीच्या भातासह तुम्ही हा छुंदा खाऊ शकता. पूर्वी छंदा बनवण्याची पद्धत थोडी वेगळी होती. पूर्वी उन्हात कैरीचा छुंदा मुरवला जात असे पण आता इतकी जागा नसते आणि वेळही नसतो त्यामुळे गॅसवर शिजवून छुंदा बनवला जातो.
कैरीचा छुंदा
साहित्य
दोन – कैरी
एक वाटी – साखर किंवा गुळ
एक चमचा हळद
चवीनुसार – मीठ
एक चमचा – जीरा पावडर
एक चमचा – लाल तिखट
कृती
दोन कैरीचे साल काढून घ्या
कैरी खिसून घ्या
त्यात एक वाटी साखर किंवा गुळ टाका.
१ चमचा हळद टाका
मीठ चवीनुसार टाका.
एक चमचा जीरा पावडर
एक चमचा लाल तिखट टाकाय
एका कढईत तयार कैरी टाका.
एकतारी पाक होई पर्यंत शिजून द्या.
तुमचा चटकदार कैरीचा छुंदा तयार आहे.
हा छुंदा तुम्ही जेवाताना तोंडी लावू शकता. हा कैरीचा छुंदा