[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्यात स्टार्टरचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. (अन्नाच्या बाबतीत बोलायचं, तर हे महत्त्व अन्नन्यसाधारण असेल कदाचित!) आपल्या भारतीयांचे बाकी कुठले स्वभावविशेष असतील, नसतील, पण आळस हा आपला स्थायीभाव आहे. कुठलीही कृती करण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रेरणा हवी असते. त्यालाच आपण कधीकधी स्टार्टर असं म्हणतो. हा स्टार्टर प्रत्येक गोष्टीत महत्त्वाचा असतो. किंबहुना, त्याच्या जोरावरच आपण कुठलीही गोष्ट करत असतो. कामावर जायचं असेल, तर पगार मिळण्याचा स्टार्टर लागतो. मैत्रिणीबरोबर फिरायला जायचं, तर गुलुगुलु गप्पा मारता येण्याचा स्टार्टर लागतो. काही खरेदी करायची, तर डिस्काउंटचा स्टार्टर लागतो. तसंच खाण्यासाठीही आपल्याला स्टार्टर लागतो. कुठलाही पदार्थ दिसला, की आपण तो आपल्या तोंडात गेला आहे, अशी कल्पना करतो आणि आपल्या तोंडातल्या लाळग्रंथी तो पदार्थ चावण्यासाठी, गिळण्यासाठी आवश्यक असलेली लाळ तयार करायला सुरुवात करतात, यालाच आपण तोंडाला पाणी सुटणं असं म्हणतो, असं आपल्याला शाळेत शिकवलं जातं. खाण्याच्या नव्या संस्कृतीमध्ये त्याला स्टार्टर असं म्हणत असावेत. कारण बाहेर खायला गेल्यानंतर मुख्य खाण्याच्या आर्डरच्या आधी आपण स्टार्टरची आर्डर देतो. कधीकधी स्टार्टरमध्येच पोट भरतं आणि मुख्य खाण्याच्या कार्यक्रमापर्यंत भूकच राहत नाही, ही गोष्ट वेगळी! बाकी काहीही असो, स्टार्टरची बातच निराळी असते. जेवण काय मागवायचं, हे ठरलेलं असतं, स्टार्टरचं लवकर ठरत नाही. कारण त्यातले पर्याय कधीकधी जास्त इंटरेस्टिंग असतात. कुणाची काही आवड असो, स्टार्टरमध्ये व्हेज क्रिस्पीला सगळ्यात जास्त प्राधान्य असतं. तर आज बघूया, हॉटेलमधली आपली फेवरेटडिश असलेल्या या व्हेज क्रिस्पीची घरगुती रेसिपी.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make veg crispy maharashtrian recipes
First published on: 05-01-2017 at 01:15 IST