उन्हाळा हा कैरीचा हंगाम! कैरी म्हटलं त्याच्या आंबटपणाची चव जीभेवर रेंगाळते. तिखट-मीठ लावून कैरी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. कधी कैरी फोडून त्याची लोणचं तयार करतात तर कधी त्याचं पन्ह तयार करून शरीराला थंडावा देतात. याशिवाय कैरीपासून विविध पदार्थ तयार केले जातात जसे की कैरीची चटणी, कैरीचा छुंदा, कैरीचा ठेचा. हे सर्व पदार्थ तुम्ही खाल्ले असतील पण तुम्ही कधी कैरीची भजी खाल्ली आहे का? होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. कैरीची भजी हा पदार्थ ऐकायला विचित्र वाटत असला तरी त्याची चव अप्रतिम आहे. एकदा खाऊन पाहाल तर नेहमी खात राहाल. चला तर जाणून घेऊ या रेसिपी

कैरीची भजी
कैरी – २
तिखट -१ चमचा
मीठ -चमचा
चाट मसाला – चवीनुसार
बेसन पीठ – २ वाटी
पाणी –
तळण्यासाठी तेल

हेही वाचा उन्हात न वाळवता बनवा कैरी सरबत प्रीमिक्स, फ्रिजशिवाय टिकणारी कैरी सरबत पावडर कशी बनवावी? ही घ्या रेसिपी

कृती
प्रथम कैरीच्या गोल चकत्या करून घ्या. चाकूने कैरी कापतना कैरी गोल गोल फिरवा चकत्या पटकन कापता येतील.
आता त्यावर तीखट, मीठ आणि चाट मसाला टाकून एकत्र करा
आता एका भांड्यात बेसन पीठ घ्या त्यात पाणी टाकून भजी तळण्यासाठी पीठ तयार करा. त्यात मसाला लावेली कैरी बूडवून गरम तेलात तळून घ्या

हेही वाचा – शेफ विकास खन्ना यांचा आवडता कैरीचा ठेचा खाल्ला आहे का? नसेल तर एकदा खाऊन पाहा, ही घ्या रेसिपी


गरमा गरम कुरुकुरीत कैरीचे भजी तयार आहे.