कोकणातील खाद्यसंस्कृती आपल्याला विविध पाककृतींमधून पाहायला मिळते. या पाककृती अनेकांना आवडतातही. त्यामुळे कोकणी पदार्थ केवळ भारतातच नाही, तर जगभरातील अनेक खाद्यप्रेमींना प्रेमात पाडतात. कोकणातील काही पदार्थ तर असे आहेत, की जे खाण्यासाठी जगभरातील पर्यटक कोकणात येतात. विशेषत: कोकणातील मांसाहार अनेकांना खूप आवडतो. पण, या कोकणी मांसाहार पदार्थांची अस्सल लज्जतदार चव मसाल्याच्या वाटणात लपलेली असते. त्यात मालवणी पद्धतीने मच्छीचे सार, कालवण, मच्छी फ्राय बनवण्यासाठी एक स्पेशल मालवणी वाटण वापरले जाते. त्यामुळे आपण आज मालवणी पद्धतीने चटपटीत, चवदार मच्छीचे वाटण कसे बनवायचे हे जाणून घेऊ. चला तर मग पाहू काय आहे ती रेसिपी….
मालवणी पद्धताने मच्छीच्या साराचे वाटण बनवण्यासाठी लागणारे साहित्य
१ वाटी ओलं खोबरं
१ छोटा कांदा
२ चमचे धणे
६-७ लसणीच्या पाकळ्या
थोडा आल्याचा तुकडा
१ चमचा हळद
४-५ कोकमाच्या पाकळ्या
अर्धा चमचा हिंग
४-५ त्रिफळे
२० बेडकी मिरच्या
कृती
१) प्रथम धणे, बेडकी मिरची, त्रिफळ गरम पाण्यात भिजवून ठेवावे.
२) साधारण २० मिनिटे हे मिश्रण नीट भिजत ठेवा.
३) त्यानंतर भिजवून ठेवलेले त्रिफळे, धणे व मिरच्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
४) हे सगळ वाटून झाल्यावर त्यामध्ये ओला नारळ, कांदा, लसणाच्या पाकळ्या, आले, हिंग, हळद हे सर्व वाटून घ्यावे. अशा प्रकारे तयार झाले मालवणी पद्धतीचे मच्छीची आमटी बनवण्यासाठी लागणारे वाटण.
५) मच्छी फ्राय करण्यासाठी किंवा कोळंबी आणि इतर मच्छीचा पदार्थ बनवताना तुम्ही हे वाटण वापरू शकता.