आपण साधारणपणे दाणे-लसूण, जवस, खोबरं यांची चटणी करतो. फारतर आपण मिरचीचा खरडा किंवा ठेचाही करतो. पण आज आपण लसणाचा वापर करुन केली जाणारी एक अतिशय आगळीवेगळी अशी वऱ्हाडी लसणाची चटणी पाहणार आहोत. ही चटणी करायला सोपी असून चवीला अतिशय मस्त असल्याने जेवण झक्कास नाही झालं तरच नवल. लसणाची चटणी फक्त तुमच्या जेवणाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. विशेष म्हणजे ही झटपट तयार होते. पाहूयात या चटणीसाठी नेमके कोणते घटक लागतात आणि ती कशी करायची…

वऱ्हाडी लसूण चटणी साहित्य

Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका
  • १ लसूण गाथा
  • १/४ वाटी लाल तिखट
  • २ टेबलस्पून गुळ
  • १/४ वाटी पाणी
  • मीठ स्वादनुसार

वऱ्हाडी लसूण चटणी कृती

स्टेप १
सर्वप्रथम लसूण सोलून घ्या.त्याचे छोटे तुकडे करा.गुळ बारीक करून घ्या.

स्टेप २
आता मिक्सर पॉट मध्ये लसूण तिखट मीठ एकत्र वाटून घ्या.

स्टेप ३
आता यात बारीक केलेला गुळ घाला.पुन्हा मिक्सर फिरवून घ्या.

स्टेप ४
आता यातच पाणी घाला.मिक्सर मधून पुन्हा एकदा काढून घ्या.या चटणी वर फोडणीचे तेल घेण्याची पद्धत आहे.ही चटणी भाकरी व कांदा अप्रतिमच लागते.

हेही वाचा >> नागपुरी आमसूलाचा सार; आजीच्या बटव्यातला उपाय, गरमागरम सार प्या पित्तासह आजार पळवा 

ही चटणी काचेच्या भांड्य़ात ठेवा जेणेकरुन ती जास्त दिवस चांगली राहील. तसेच ती फ्रिजमध्ये ठेवल्यास महिनाभर खाऊ शकता.